अनैतिक संबंधांच्या आरोपावरून पतीने पत्नीचे सोशल अकाऊंट केले हॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:28 IST2021-01-08T04:28:47+5:302021-01-08T04:28:47+5:30

पुणे : पतीनेच पत्नीचे सोशल मीडियाचे अकाऊंट हॅक करून स्वत: एका मुलासाेबत चॅटिंग करून पत्नीला तुझे बाहेरच संबंध असल्याचा ...

Husband hacks wife's social account on charges of immoral relationship | अनैतिक संबंधांच्या आरोपावरून पतीने पत्नीचे सोशल अकाऊंट केले हॅक

अनैतिक संबंधांच्या आरोपावरून पतीने पत्नीचे सोशल अकाऊंट केले हॅक

पुणे : पतीनेच पत्नीचे सोशल मीडियाचे अकाऊंट हॅक करून स्वत: एका मुलासाेबत चॅटिंग करून पत्नीला तुझे बाहेरच संबंध असल्याचा आरोप करून घटस्फोट दे, अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अप्पर इंदिरानगर येथे हा प्रकार १२ मे २०१९ ते २७ एप्रिल २०२० दरम्यान घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी २३ वर्षांच्या विवाहितेने बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, पतीवर त्याच्या नातेवाईकांनी फिर्यादी यांना माहेरुन २ लाख रुपये घेऊन ये, असे बोलून मारहाण केली. पतीने फिर्यादीचे सोशल मीडियाचे अकाऊंट हॅक केले. स्वत: मुलासोबत चॅटिंग केले. त्यावरुन फिर्यादीला तुझे बाहेर संबंध आहेत. तू मला घटस्फोट दे अशी धमकी देऊन फिर्यादीचा मानसिक व शारीरीक छळ केला.

Web Title: Husband hacks wife's social account on charges of immoral relationship