हेलिकॉप्टरला ब्रेक! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पुणे-बारामती ‘ऑन रोड’ दौरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 19:47 IST2026-05-14T19:46:40+5:302026-05-14T19:47:08+5:30

सुनेत्रा पवारांनी हेलिकॉप्टरचा खर्च टाळत मुंबई ते पुणे विमानाने प्रवास केला, पुण्यातून मोजकाच ताफा सोबत घेत बायरोड बारामतीतील उदघाटनाचे ठिकाण गाठले

Helicopter breaks! Deputy Chief Minister Sunetra Pawar's Pune-Baramati 'on road' tour | हेलिकॉप्टरला ब्रेक! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पुणे-बारामती ‘ऑन रोड’ दौरा

हेलिकॉप्टरला ब्रेक! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पुणे-बारामती ‘ऑन रोड’ दौरा

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील होळ येथे एका उदघाटनाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या हेलिकॉप्टरने येणार होत्या. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सुनेत्रा पवार यांनी हेलिकॉप्टरचा खर्च टाळत मुंबई ते पुणे विमानाने प्रवास करत पुण्यातून मोजकाच ताफा सोबत घेत बायरोड बारामतीतील उदघाटनाचे ठिकाण गाठले. 

बारामती तालुक्यातील होळ येथे ४५ मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचा उदघाटनाचा सुनेत्रा पवार यांचा नियोजित दौरा होता. देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पवार यांनी हेलिकॉप्टर प्रवास व शासकीय ताफा घेत प्रवास करण्याचे टाळले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा हा दौरा पूर्वनियोजित होता. त्यामुळे पवार या थेट मुंबई वरून हेलिकॉप्टरने थेट सोमेश्वरनगर येथील काकडे महाविद्यालयाच्या आवारात उतरणार होत्या. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्याचे काम सुरू होते. काल पुन्हा याठिकाणी हेलिकॉप्टर उतरवण्याचे रद्द करून करंजे याठिकाणी हेलिपॅड तयार केले गेले. याठिकाणी सुनेत्रा पवार उतरून कार्यक्रमस्थळी पोहचणार होत्या. मात्र सुनेत्रा पवार यांनी हेलिकॉप्टरचा दौरा रद्द करत मोजकाच ताफा घेत पुणे ते बारामती रस्त्याने प्रवास करण्याचे पसंद केले. 

पुणे येथून निघाल्यानंतर  कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत आणि मार्गातील नागरिकांच्या भेटीगाठी घेत त्यांनी रस्तामार्गे बारामतीकडे प्रस्थान केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. होळ या ठिकाणी साडेचार वाजता असलेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश अंबिटकर हे सात वाजता पोहोचले. पंतप्रधान यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्रांनी आपली सुरक्षा घटवल्याचे दिसले तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ताफ्यात तीन गाड्या तसेच आरोग्यमंत्री प्रकाश अंबिटकर यांच्या ताफ्यात तीन गाड्या घेत दोन्ही नेते कार्यक्रमस्थळी पोहचले.

Web Title : सुनेत्रा पवार ने हेलीकॉप्टर छोड़ा, पुणे-बारामती सड़क मार्ग से यात्रा की

Web Summary : प्रधानमंत्री मोदी की अपील पर प्रतिक्रिया देते हुए, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ने हेलीकॉप्टर यात्रा और सड़क काफिले से परहेज किया, पुणे से बारामती तक एक कार्यक्रम के लिए कार का विकल्प चुना, जिससे खर्च और सुरक्षा विवरण कम हो गया।

Web Title : Sunetra Pawar Abandons Helicopter, Travels Pune-Baramati by Road

Web Summary : Responding to PM Modi's appeal, Deputy Chief Minister Sunetra Pawar avoided helicopter travel and road convoy, opting for a car from Pune to Baramati for an event, minimizing expenses and security detail.