शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Pune Rain: पुण्यात पावसाचा धुमाकूळ; आजच्या एका दिवसात तब्बल ६५ मिली मिटर पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 19:45 IST

सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज, हडपसर, लोहगाव, खराडी, पिंपरी चिंचवड, औंध, बाणेर, बालेवाडी भागांत गारांसह जोरदार पाऊस पडला असून पुणेकरांची चांगलीच धांदल उडाल्याचे चित्र दिसून आले आहे

पुणे : पुण्यात सोमवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे. सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. आजच्या पावसाने पुणेकरांची  दाणादाण उडाली आहे. सर्वत्र पाणीचपाणी पाहायला मिळत आहे. या पावसात झाडपडीच्या अनेक घटना घडल्या असून रस्तेही मोठ्या प्रमाणावर जलमय झाले आहेत. पुण्यातील सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज, हडपसर, लोहगाव, खराडी, पिंपरी चिंचवड, औंध, बाणेर, बालेवाडी भागांत गारांसह जोरदार पाऊस पडला असून पुणेकरांची चांगलीच धांदल उडाल्याचे चित्र दिसून आले आहे. 

आज भारतीय हवामान शास्र विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार सायंकाळी साडेपाच पर्यंत शहरात ६५ मिली मिटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्या खालोखाल हडपसरमध्ये ४२.५, पाषाण ३६.०३, लोहगाव २१ तर एनडीए येथे ८४ मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. पिंपरीतील दापोडी येथे २९, चिंचवड २८.५ पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील माळीन येथे १८.५, डुडुळगाव १३.५, निमगीरी १३, नारायणगांव १२, तळेगाव ढमढेरे ६.५, राजगुरूनगर ४.५ मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे.

महापालिकेच्या हवामान केंद्रानुसार (पाऊस मिली मिटरमध्ये )

- खडकवासला - १०४.२- सिंहगड रोड - १००.२- कोंढवा येवलेवाडी - ९२.२- बिबवेवाडी - ८१.४- कोथरूड बावधण - ६६.६- वारडे कर्वेनगर - ५९.२- वानवडी रामटेकडी - ५४.६- येरवडा कैलास - ५४- भवानी पेठ - ५४- कसबा विश्रामबागवाडा - ५३- ढोले पाटील रोड - ५०.२- शिवाजी नगर - ४८- औंध बाणेर - ४३- हडपसर मुंढवा - ३७- नगररोड - ३६.४

आकडेवारी काय सांगते

- शहरात १४५ ठिकाणी पाणी साचले.- ८२ ठिकाणी झाडे पडली- ५० हून अधिक घरे आणि दुकानात पाणी शिरले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Rain Havoc: 65mm Rainfall Recorded in a Single Day

Web Summary : Pune was lashed by heavy rain, recording 65mm rainfall. Waterlogging and tree falls disrupted life. Worst-hit areas included Sinhagad Road, Hadapsar, and Pimpri-Chinchwad. Over 145 locations saw water accumulation, and trees fell in 82 places.
टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामान अंदाजSocialसामाजिकWaterपाणीMaharashtraमहाराष्ट्रPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाTemperatureतापमान