"इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले अन् अत्याचार केला", २ वर्षापूर्वी घडलेला प्रकार तीने शिक्षकांना सांगितला..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 14:47 IST2024-09-20T14:47:20+5:302024-09-20T14:47:40+5:30

'गुड टच बॅड टच' उपक्रमात मुलीला धीर आला अन् तिने समोर जाऊन शिक्षकांना दोन वर्षांपूर्वी आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला

He told the teacher what happened 2 years ago made him unconscious by giving injections and tortured him | "इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले अन् अत्याचार केला", २ वर्षापूर्वी घडलेला प्रकार तीने शिक्षकांना सांगितला..

"इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले अन् अत्याचार केला", २ वर्षापूर्वी घडलेला प्रकार तीने शिक्षकांना सांगितला..

किरण शिंदे 

पुणे : १४ वर्षाची शाळकरी मुलगी, पुण्यातील एका शाळेत आठवीच्या वर्गात शिक्षण घेते. वर्गात सुरू असणाऱ्या 'गुड टच बॅड टच' उपक्रमामुळे तिला धीर आला. आणि तिने पुढाकार घेत दोन वर्षांपूर्वी आपल्या सोबत घडलेला तो भयंकर प्रकार शिक्षकांना सांगितले. आणि यातून समोर आलं या मुलीच्या नात्यातीलच एका तरुणाचे भयंकर कृत्य. पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडला. पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार त्या तरुणीच्या नात्यातच असणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार दोन वर्षांपूर्वी म्हणजेच पीडित मुलगी सहावीच्या वर्गात असताना घडला. आरोपी तरुणाने या मुलीच्या दंडात इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले आणि तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले. आरोपीने शरीर संबंध ठेवत असतानाचे फोटो देखील काढले. त्यानंतर ही घटना कोणाला सांगितल्यास आणि बोलावे त्या ठिकाणी न आल्यास हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. 

दरम्यान पीडित मुलगी ज्या शाळेत शिक्षण घेते त्या ठिकाणी 'गुड टच बॅड टच' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे या मुलीला धीर आला आणि तिने समोर जाऊन शिक्षकांना दोन वर्षांपूर्वी आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. शिक्षकांनीही या मुलीच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर पीडित तरुणीच्या आईने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी तरुणाला अटकही केली आहे. त्याने हा प्रकार कधी केला? पीडित मुलीला त्याने कोणती इंजेक्शन दिले होते? ते इंजेक्शन कुठून आणले होते? या सर्व घटनेचा तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

Web Title: He told the teacher what happened 2 years ago made him unconscious by giving injections and tortured him