पुणेकरांचा नेम नाय !! नव्या गाडीचा अानंद साजरा करत वाटले साेन्याचे पेढे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 09:15 PM2018-09-06T21:15:00+5:302018-09-06T21:19:04+5:30

पुण्यातील सुरेश पाेकळे यांनी महागडी कार विकत घेतल्याच्या अानंदापायी नागरिकांना चक्क साेन्याचे पेढे खाऊ घातले.

he distributed golden sweets for his new car | पुणेकरांचा नेम नाय !! नव्या गाडीचा अानंद साजरा करत वाटले साेन्याचे पेढे

पुणेकरांचा नेम नाय !! नव्या गाडीचा अानंद साजरा करत वाटले साेन्याचे पेढे

googlenewsNext

पुणेपुणेकर काय करतील याचा काही नेम नाही असे म्हणतात. एक साे एक अफलातून कल्पनांसाठी पुणेकर नेहमीच अाेळखले जातात. पुण्यातील धायरी परिसरातील सुरेश पाेकळेंची तर बातच न्यारी अाहे. नवीन गाडी घेतली म्हणून पाेकळेंनी चक्क साेन्याचे पेढे वाटले. त्यांच्या या नव्या गाडीमुळे नागरिकांना साेन्याचे पेढे खान्याचा याेग अाला. 


    बागायतदार असलेले सुरेश पाेकळे हे धायरी परिसरात राहतात. त्यांनी महागडी अशी 60 लाखांची जॅग्वार एक्स एफ ही कार विकत घेतली. या नव्या कारचा अानंद साजरा करताना त्यांनी त्यांच्या नातेवाईक- मित्रांना चक्क साेन्याचे पेढे खाऊ घातले. त्यासाठी काका हलवाई मिठाईवाल्यांकडून त्यांनी साेन्याचे वर्ख असलेले पेढे तयार करुन घेतले. तब्बल सात हजार रुपये किलाे दराने काका हलवाईकडून पाेकळे यांना पेढे बनवून देण्यात अाले. किती किलाे पेढे त्यांनी वाटले याची माहिती मिळू शकली नाही. परंतु पाेकळे यांच्या अानंदापायी नागरिकांना मात्र सुवर्ण पेढे खान्याची संधी मिळाली. पाेकळे यांनी अापला आनंद अशाप्रकारे शाही पद्धतीने साजरा केला. 

Web Title: he distributed golden sweets for his new car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.