शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

हर हर महादेव! श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावणी सोमवारी लाखो भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 15:25 IST

पहिल्याच श्रावण सोमवारी लाखो भाविकांनी हर हर महादेव, जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय अशा घोषणा देत मुसळधार पाऊस व दाट धुक्यामध्ये पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले.

भीमाशंकर: बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणार्‍या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पहिल्याच श्रावण सोमवारी सुमारे पावणे दोन लाख भाविकांनी हर हर महादेव, जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय अशा घोषणा देत मुसळधार पाऊस व दाट धुक्यामध्ये पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावेळी शिवलिंगावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.      श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. दरवर्षी संपुर्ण श्रावण महिन्यामध्ये पविञ शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक भक्त येत असतात. गेल्या आठ ते दहा दिवसांपासुन या भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे निसर्ग सौंदर्य फुलले असून जिकडे तिकडे धबधबे हे खळखळुन वाहत आहेत. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी व पविञ अशा शिवलिंगाचे दर्शन असा दुहेरी योग जुळून आला. त्यामध्येच श्रावण महिन्याचा पहिला सोमवार त्या अगोदर दोन दिवस सुट्ट्या आल्यामुळे श्री क्षेञ भीमाशंकर येथे प्रचंड गर्दी पहावयास मिळाली. रविवारची सुट्टी लागून असल्यामुळे ह्या दिवसांमध्ये गर्दीचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला या तीन दिवसांमध्ये सुमारे चार ते पाच लाख भाविकांनी पविञ अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले.      वाहनतळ ते भीमाशंकर मंदिर परिसरात खेड उपविभागीय पोलीस विभाग यांच्या अंतर्गत घोडेगाव व खेड पोलीस ठाण्यांबरोबरच जिल्ह्यातून पुरेसा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. यामध्ये एक उपविभागिय पोलिस अधिकारी, एक पोलिस निरिक्षक, एकविस सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलिस उपनिरिक्षक अधिकारी तसेच १६० पुरुष पोलीस अमंलदार व ४० महिला पोलिस अमंलदार, एक आर. सी. पी. पथक, ७४ होमगार्ड,तसेच श्वान पथक असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.       आळंदी येथील स्वकाम सेवा संघ यांच्या वतीने मंदिर परिसर दर्शनबारी पायरी मार्ग या ठिकाणी स्वच्छता करण्यात येत होती. अमरनाथ सेवा संघ मंचर यांच्या वतीने ठिक ठिकाणी मोफत फराळ वाटप करण्यात येत होता. घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार्कींग नं एक ते पाच व बस स्थानक परिसरामध्ये सुसज्ज असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोहित कम्बोज भारतीया फांउंडेशन संचलित शिवसेवा संकल्प  फाउंडेशन यांच्या वतीने वैद्यकिय सुविधा सुरक्षा गार्ड पुरविण्यात आली. 

टॅग्स :PuneपुणेBhimashankarभीमाशंकरTempleमंदिरforestजंगलSocialसामाजिकRainपाऊसweatherहवामान अंदाज