दिल्लीच्या अमर कॉलनी भागात एका आयआरएस अधिकाऱ्याच्या २२ वर्षीय मुलीची हत्या आणि बलात्कार केल्याप्रकरणी राजस्थानच्या अलवरमधील राहुल मीणा याला अटक करण्यात आली आहे. एकेकाळी बारावीत ९०% गुण मिळवून कुटुंबाची मान अभिमानाने उंच करणारा राहुल आज एका नराधमाच्या रूपात पोलिसांच्या कोठडीत आहे. या गुन्ह्यामागे ऑनलाइन गेमिंगचे व्यसन, कर्जाचा डोंगर आणि आलिशान जगण्याची हाव अशी धक्कादायक कारणे समोर आली आहेत.
अभ्यासात हुशार, पण…
राहुल मीणा हा मूळचा राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील राजगडचा रहिवासी. राहुलची चुलत बहीण सांगते की, तो अभ्यासात अत्यंत तल्लख होता. १० वीत ७३% आणि १२ वी सायन्समध्ये त्याने ९०% गुण मिळवले होते. मात्र, मोबाईल आणि ऑनलाइन गेमिंगच्या नादाने त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केले.
लक्झरी लाईफ आणि रीलचं वेड
राहुलला महागड्या गाड्या आणि विलासी जीवनशैलीचे प्रचंड वेड होते. सोशल मीडियावर तो नेहमी महागड्या कारसोबतचे फोटो आणि रिल्स शेअर करायचा. हे वैभव मिळवण्यासाठी त्याने शॉर्टकट शोधला आणि तो 'ऑनलाइन लूडो'च्या आहारी गेला. गावात दिवसभर मित्रांसोबत पैशांवर लूडो खेळताना त्याने लाखो रुपये गमावले होते.
कर्जाचा विळखा आणि सूडाची भावना
राहुलचे वडील पीडित मुलीच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये कामाला होते. वडिलांच्या ओळखीमुळे राहुलला या अधिकाऱ्याच्या घरी नोकरी मिळाली होती. मात्र, तिथेही त्याने पैशांची अफरातफर केली आणि लोकांकडून उधार घेतलेली रक्कम न फेडल्यामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. ज्या लोकांकडून त्याने कर्ज घेतले होते, ते त्याच्यावर सतत दबाव टाकत होते. याच पैशांच्या गरजेतून आणि नोकरीवरून काढल्याच्या रागातून त्याने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे.
अन् दिल्लीत 'तो' काळा खेळ खेळला...
दीड महिन्यापूर्वी गावात परतलेला राहुल अचानक दिल्लीला गेला. तो चोरीच्या उद्देशाने गेला होता की सूड घेण्यासाठी, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनेच्या दिवशीच पोलिसांनी त्याला दिल्लीतील एका हॉटेलमधून बेड्या ठोकल्या. सध्या राहुल चार दिवसांच्या पोलीस कोठडीत असून, त्याच्याकडून या गुन्ह्याचे अधिक धागेदोरे शोधले जात आहेत.
Web Summary : Rahul Meena, once a bright student, is accused of murder and rape in Delhi. Addicted to online gaming and burdened by debt, his desire for a luxurious lifestyle led him to commit the crime after being fired for embezzlement from the victim's father's workplace. Police are investigating the motive.
Web Summary : राहुल मीणा, कभी एक प्रतिभाशाली छात्र, दिल्ली में हत्या और बलात्कार के आरोप में गिरफ्तार। ऑनलाइन गेमिंग की लत और कर्ज के बोझ ने उसे अपराध करने के लिए प्रेरित किया, क्योंकि उसे पीड़िता के पिता के कार्यस्थल से गबन के आरोप में निकाल दिया गया था। पुलिस मामले की जांच कर रही है।