पंजाब आणि गुजरात विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले असतानाच आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला. राघव चड्डा यांच्यासह आपच्या सात खासदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाच्या 'ऑपरेशन लोटस'वर आपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, हा भाजपाने पंजाबच्या लोकांना धक्का दिला आहे.
आपने राज्यसभेत उप गटनेते असलेल्या खासदार राघव चड्डा यांना पदावरून हटवले. त्यानंतर अशोक मित्तल यांची या पदी नियुक्ती केली. त्यानंतर महिनाभरातच भाजपाने आपला मोठा तडाखा दिला आहे. खासदार राघव चड्डा यांनी दोन खासदारांसह पत्रकार परिषद घेत दोन तृतीयांश गट फुटून भाजपामध्ये विलीन होत असल्याचे जाहीर केले.
खासदारांनी घेतली भाजपाध्यक्षांची भेट
पत्रकार परिषदेनंतर खासदार राघव चड्डा, संदीप पाठक, अशोक मित्तल यांच्यासह इतरांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली.
राघव चड्डा यांच्यासह खासदार स्वाती मालीवाल, खासदार हरभजन सिंग, संदीप पाठक, अशोक मित्तल, राजिंदर गुप्ता आणि विक्रमसिंग साहनी हे आपचे खासदार आता भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे भाजपाची राज्यसभेतील ताकद वाढणार असून, सात खासदार कमी झाल्यामुळे आपला मोठा झटका बसला आहे.
भाजपाचे मिशन गुजरात, पंजाब
२०२७ मध्ये गुजरात आणि पंजाब या दोन मोठ्या राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. गुजरातमध्ये भाजपाचे वर्चस्व कायम आहे. तर पंजाबमध्ये भाजपाकडून यावेळी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न जोरदार प्रयत्न सुरू झाले आहे. पंजाबमध्ये काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल हे दोन्ही पक्ष इतके प्रभावी राहिलेले नाही. आप पक्ष पंजाबमध्ये सत्तेत आहे. त्यामुळे भाजपाची लढाई थेट आपसोबतच असणार आहे. त्याआधीच आपला भगदाड पडले आहे.
Web Summary : In a setback for AAP, seven MPs, including Raghav Chadha, defected to BJP amidst upcoming state elections. Arvind Kejriwal condemned BJP's 'Operation Lotus,' calling it a betrayal to Punjab. Internal strife preceded the defection. BJP gains strength in Rajya Sabha.
Web Summary : आप को झटका, राघव चड्ढा सहित सात सांसद भाजपा में शामिल। अरविंद केजरीवाल ने भाजपा के 'ऑपरेशन लोटस' की निंदा की और इसे पंजाब के साथ विश्वासघात बताया। आंतरिक कलह के बाद दलबदल हुआ। राज्यसभा में भाजपा को मजबूती मिली।