शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी विचारतील दिल्लीत जाऊन जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ओबीसींचे राजकीय आरक्षण जाण्याला राज्य सरकार नाही, तर केंद्र सरकारच जबाबदार आहे. वेळप्रसंगी सगळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ओबीसींचे राजकीय आरक्षण जाण्याला राज्य सरकार नाही, तर केंद्र सरकारच जबाबदार आहे. वेळप्रसंगी सगळे ओबीसी दिल्लीत जंतरमंतरवर जमून मोदी सरकारला याचा जाब विचारतील, असा इशारा काँग्रेसच्या ओबीसी सेलचे राज्य अध्यक्ष भानुदास माळी यांंनी दिला.

काँग्रेस भवनमध्ये माळी यांनी शहरातील प्रमुख ओबीसी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, सुनील पंडित, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार दीप्ती चवधरी आदी या वेळी उपस्थित होते.

पत्रकारांबरोबर बोलताना माळी म्हणाले की, केंद्र सरकारने ओबीसी संदर्भातील अहवाल एकाही राज्यांना दिलेला नाही. विधानसभेच्या माजी अध्यक्षांनी विधानसभेत ठराव करून या अहवालाची मागणी केंद्र सरकारकडे केली, मात्र त्याची दखलच घेतली गेली नाही. हा ओबीसींना राजकारणातूनच नव्हे तर समाजजीवनातूनच संपवण्याचा डाव आहे व त्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. सरकारी नोकऱ्या शिल्लक नाहीत व खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षण नाही.

राज्यातील ओबीसी समाज यावरून संतप्त आहे, त्यावरून काहीही होऊ शकते, असा इशारा देऊन माळी म्हणाले, शिवसेना राष्ट्रवादी यावर आक्रमक दिसत नाहीत, पण तो त्यांचा पक्षीय प्रश्न आहे. राजकीय आरक्षणाला वेळ लागेल, तोपर्यंत राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना ओबीसी आरक्षण द्यावे.