सांस्कृतिक खाते राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या गटाकडे द्या; बाबासाहेब पाटलांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2023 12:48 IST2023-07-14T12:46:07+5:302023-07-14T12:48:35+5:30

गेल्या चार वर्षांपासून मराठी चित्रपट सृष्टीला उद्योगाचा (इंडस्ट्रिअल) दर्जा मिळावा व अन्य बाबींसाठी प्रयत्न

Give the cultural account to the Ajit pawar geoup of the Nationalist Party Babasaheb patil demand | सांस्कृतिक खाते राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या गटाकडे द्या; बाबासाहेब पाटलांची मागणी

सांस्कृतिक खाते राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या गटाकडे द्या; बाबासाहेब पाटलांची मागणी

पुणे : महाराष्ट्रात परत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत आहे. दरम्यान, खातेवाटप अद्याप झालेली नसून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाटेला येणाऱ्या खात्यांमध्ये सांस्कृतिक खाते राष्ट्रवादीकडे द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चित्रपट व संस्कृती विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केले. याबाबतची निवेदने त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली.

अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  बाबासाहेब पाटील गेल्या चार वर्षांपासून मराठी चित्रपट सृष्टीला उद्योगाचा (इंडस्ट्रिअल) दर्जा मिळावा, त्या क्षेत्रातील कामगारांचे कार्यालय व्हावे, सिने कलाकार व तंत्रज्ञ आणि त्यासंदर्भातील सर्व कामगारांचे प्रश्न सोडविणे, सिंगल चित्रपटगृह बाबतीतील जाचक अटी शिथिल व्हाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. हे खाते राष्ट्रवादीकडे आल्यास हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी बळ मिळेल, असेही बाबासाहेब यांनी सांगितले.

Web Title: Give the cultural account to the Ajit pawar geoup of the Nationalist Party Babasaheb patil demand