Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 14:23 IST2025-10-06T14:16:58+5:302025-10-06T14:23:41+5:30
Gautami Patil Accident Case Update: गौतमी पाटील हिच्या कारने रिक्षाला धडक दिली होती, या प्रकरणी गौतमी पाटील हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
पुण्यात नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वाहनाने ३० सप्टेंबर रोजी एका रिक्षाला वडगाव पुलाजवळ मागून जोरदार धडक दिली. त्यामध्ये रिक्षाचालक मरगळे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातात रिक्षात बसलेले इतर दोघेही जखमी झाल्याची माहिती आहे. ते सध्या आता व्हेंटिलेटर असल्याची माहिती समोर आली आहे. एवढा मोठा अपघात झाला असतानाही गौतमी पाटील हिच्या टीमकडून कोणतीही चौकशी करण्यात आली नाही, किंवा साधा एक मेसेजही आला नाही असा आरोप रिक्षा चालकाच्या कुटुंबीयांनी केला आहे. याबाबत पोलिसही सहकार्य करत नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. दरम्यान, आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. गौतमी पाटीलला पुणे पोलिसांनी क्लीन चीट दिली आहे.
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
या प्रकरणी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे पोलिसांना कारवाई करण्यासाठी फोन केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी चौकशी केली. ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी गौतमी पाटील त्या कारमध्ये नसल्याचे समोर आले आहे. यामुळे गौतमी पाटील हिच्याविरोधात गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे.
पुणे पोलिसांनी काय सांगितले?
अपघात प्रकरणी पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही तपासले आहेत. अपघात प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही आणि अन्य चौकशीमध्ये गौतमी पाटील कारमध्ये नव्हती असे समोर आले आहे. चालकाचे मेडिकल चेकअप केले आहे.
अपघात प्रकरणी कुटुंबीयांचा आरोप
अपघातग्रस्तांच्या नातेवाईक आणि इतर लोकांनी सिंहगड पोलीस स्टेशनसमोर आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी या तपासासाठी विशेष तपास अधिकारी नेमला आहे. गौतमी पाटील हिच्या कार चालकाची चूक असताना हा अपघात झाला. मात्र या संपूर्ण प्रकरणाची गौतमी पाटीलच्या टीमकडून दखल घेण्यात आली नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. तसेच पोलिसांकडून सीसीटीव्ही उपलब्ध होत नाही, पोलीस योग्य ते सहकार्य करत नाहीत असा आरोप आता रिक्षाचालक मरगळे यांच्या कुटुंबीयांनी केला होता. अखेर पोलिसांना आता जाग आली असून त्यांनी या अपघाताच्या तपासासाठी विशेष अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे.