शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 22:22 IST

Ganesh Kale News: पुण्यात गणेश काळे याची भररस्त्यात हत्या करण्यात आली. या प्रकरणातील चौघांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत.

Ganesh Kale Pune Crime News: पुण्यात गणेश काळे या ३२ वर्षीय तरुणाची शनिवारी (१ नोव्हेंबर) दुपारी हत्या करण्यात आली. दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी गणेशवर गोळीबार केला. चार गोळ्या लागल्यानंतर आरोपींनी गणेशवर कोयत्याने वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर फरार झालेल्या संशयित आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. चौघांना पोलिसांनी पकडले असून, दोघे अल्पवयीन आहेत. 

गणेश काळेची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी ११ पथके स्थापन करून वेगवेगळ्या भागात रवाना केली होती. रात्री पोलिसांना आरोपींना शोधण्यात यश आले. चारही आरोपींना खेड शिवारातून ताब्यात घेण्यात आले. यातील दोघे अल्पवयीन आहेत. अमन शेख, अरबाज पटेल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

साताऱ्याच्या दिशेने पळून जात होते. खेड-शिवापूरच्या परिसरात त्यांना अटक करण्यात आली. अमन शेख, अरबाज पटेल या दोघांसह चारही आरोपी आंदेकर टोळीशी संबंधित असल्याची माहिती माहिती पोलीस सूत्रांनी प्राथमिक तपासाअंती दिली. 

आधी रिक्षा अडवली नंतर गोळ्या घातल्या

गणेश काळे हा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतो. तो दुपारी तीनच्या सुमारास येवलेवाडीतून खडीमशीन चौकाकडे येत होता. त्यावेळी दोन दुचाकीवरील चार हल्लेखोर त्याच्या मागावर होते. त्यांनी तेथील पेट्रोलपंपाजवळ गणेशची रिक्षा अडवली. 

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तो गडबडला. मात्र, त्याला सावरण्याची संधी मिळण्यापूर्वीच दोघांनी त्याच्यावर गोळीबार सुरु केला. त्याच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी चार गोळ्या मानेत, छातीत व पोटात घुसल्या. त्यामुळे, तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यानंतर, दोघा हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात कोयत्याचे वार केले. त्यामुळे तो जागीच गतप्राण झाला. 

एकाच दुचाकीवरून चौघे गेले पळून

पोलिसांना घटनास्थळी एक दुचाकी मिळून आली आहे. तिचा वापर हल्लेखोरांनी केला आहे. येताना ते दोन दुचाकीवर आले होते. मात्र पळून जाताना एक दुचाकी घटनास्थळीच सोडून एकाच दुचाकीवरून चौघांनी पळ काढला होता. 

दरम्यान, या घटनेची माहिती कळताच गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, निखिल पिंगळे, एसीपी विजय कुंभार यांच्यासह कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, गणेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी पेट्रोल पंप व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेतले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ganesh Kale Murder: Four Suspects Found, Two Arrested, Names Revealed

Web Summary : Ganesh Kale, 32, was murdered in Pune. Police arrested four suspects, including two juveniles, in connection with the shooting and cleaver attack. The arrested suspects are Aman Sheikh and Arbaz Patel.
टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याCrime Newsगुन्हेगारीFiringगोळीबारcctvसीसीटीव्हीPoliceपोलिसDeathमृत्यू