शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

एड्स नियंत्रण अडकले निधीत

By admin | Updated: July 7, 2015 04:55 IST

केंद्र शासनाचा नॅशनल एड्स कंट्रोल आॅर्गनायझेशन आणि राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेतर्फे चालविला जाणाऱ्या एड्स नियंत्रण निधीअभावी अनेक संस्थांचे काम बंद होण्याची वेळ आली अहे.

पुणे : केंद्र शासनाचा नॅशनल एड्स कंट्रोल आॅर्गनायझेशन (नॅको) आणि राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेतर्फे चालविला जाणाऱ्या एड्स नियंत्रण निधीअभावी अनेक संस्थांचे काम बंद होण्याची वेळ आली अहे. चौथ्या टप्प्यातील या कार्यक्रमात एप्रिल २०१२ ते मार्च २०१७ या कालावधीसाठी देशातील सर्व राज्यांतील एड्स रोगावर नियंत्रण करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. केंद्राकडून हा निधी राज्य शासनाकडे पोहचविला जातो. त्यानंतर राज्य शासन त्यात आपल्या तरतुदीनुसार निधीची भर घालते. १ एप्रिल २०१५ पासून हा निधी शासनाकडून न मिळाल्याने आता पुढे हे नियंत्रणाचे काम कसे चालू ठेवायचे हा प्रश्न संस्थाचालकांपुढे उभा राहिला आहे. राज्यात चालू असणारे एड्स नियंत्रणाचे काम अशा पद्धतीने बंद करावे लागल्यास समाजात एड्स आणि गुप्तरोग संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याचे समपथिक ट्रस्टच्या बिंदुमाधव खिरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)-----------केंद्र आणि राज्य शासनाकडून येणाऱ्या निधीमध्ये कपात करण्यात आली आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांना एड्स नियंत्रण कार्यक्रमासाठी देण्यात येणारा निधी अपुरा असल्याने संस्थांवर आपले काम थांबविण्याची वेळ आली आहे. - कल्याणी पाटील, एड्स प्रतिबंधक आणि , नियंत्रण कक्षाच्या प्रमुख-----------हा निधी संस्थांपर्यंत यायला उशीर होतो. आॅक्टोबर महिन्यापर्यंत थकीत निधीतील काही रक्कम येईल अशी आशा आहे. - दीपक निकम, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, प्रकल्प अधिकारी-----------आमच्यासारख्या अनेक संस्था पुण्यात आणि राज्यभरात एड्स नियंत्रणासाठी काम करत आहेत. अशाप्रकारे कोणालाही विश्वासात न घेता कर्मचारी कपात करावी असा आदेश शासनाने काढणे योग्य नाही. एप्रिल २०१५ पासून या कर्मचाऱ्यांचे पगार आम्ही आमच्या खिशातून केले आहेत. इथून पुढे नेमके काय होणार याबाबत कोणतीच ठोस माहिती आम्हाला मिळालेली नाही. याबाबत सरकारने ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. याबाबत राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला असता, त्यांना याबाबत पुरेशी माहिती नसल्याचे आढळले. त्यामुळे दाद कुणाकडे मागायची हा आमच्यापुढील मोठा प्रश्न आहे. - बिंदुमाधव खिरे, समपथिक ट्रस्ट, अध्यक्ष