शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘वर्क फ्रॉम होम’ची मजा संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एकीकडे पाचवी ते आठवीच्या शाळा १ फेब्रुवारीपासून सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत, तर दुसरीकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : एकीकडे पाचवी ते आठवीच्या शाळा १ फेब्रुवारीपासून सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत, तर दुसरीकडे आयटी कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना ‘रोटेशन’ पध्दतीने कामावर बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची साथ अजूनही पूर्णपणे संपलेली नसल्याने कर्मचाऱ्यांना दैनंदिन व्यवहारात नव्याने काही गोष्टींचा समावेश करावा लागणार आहे. आपले व्यावसायिक आयुष्य पूर्वीसारखे नसेल, याची जाणीव ठेवत प्रत्येकाने ऑफिसमध्ये वावरताना स्वत:च्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी पूर्णपणे संपलेला नाही. शहरात दररोजची सरासरी २००-२५० कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. आयटीतील कर्मचारी मार्च महिन्यापासून ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. आता बहुतांश आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना रोटेशन पध्दतीने कामावर रुजू होण्याबाबत ‘ई-मेल’ पाठवले आहेत. अशा वेळी कामावर रुजू होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर काळजी घेणे अपरिहार्य आहे.

जनरल फिजिशीयन डॉ. प्रेरणा अग्रवाल यांनी सांगितले की, शरीरातील ‘अँटिबॉडीज’ची पातळी आणि प्रतिकारशक्ती तपासण्यासाठी निरोगी व्यक्तीने दर सहा महिन्यांनंतर स्वत:च्या आरोग्याचे ‘स्क्रिनिंग’ करावे. ‘अ‍ॅंटिजेन’सारख्या चाचण्यांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग त्वरित स्पष्ट होतो. काम सुरू करण्यापूर्वी स्वत:ची अँटिजेन टेस्ट नक्की करुन घ्यावी. कामाच्या निमित्ताने प्रवास करण्याची वेळही येऊ शकते. अशा वेळी वेळीच तपासणी करून घेणे आणि त्यानुसार उपचार गरजेचे आहेत. आयजीजी अँटिबॉडी चाचणी, तांबड्या रक्तपेशी, पांढऱ्या रक्त पेशी आणि प्लेटलेट्स यासह रक्तातील पेशींचे मूल्यांकन करणाऱ्या रक्त चाचण्याही करुन घेता येतील.

चौकट

ऑफिसला गेल्यावर पूर्वीप्रमाणे एकमेकांना हस्तांदोलन करणे, मिठी मारणे अशा गोष्टी काही काळ तरी टाळाव्या लागतील. कंपन्यांतर्फे शरीराचे तापमान तपासणे, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सिंग यादृष्टीने उपाययोजना केल्या जातीलच; मात्र स्वत:चे सॅनिटायझर जवळ बाळगणे, मास्कचा वापर, आपली बसण्याची जागा स्वच्छ असल्याची खात्री करुन घेणे, एकमेकांच्या वस्तू न हाताळणे अशी काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल. कँटीनमध्ये जेवण्यापेक्षा घरुन स्वत:चा डबा घेऊन जाता येईल. सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास, ताप असे कोणतेही लक्षण दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.

- डॉ. सिध्दार्थ पाटील, जनरल फिजिशियन

--------------------

काय काळजी घ्याल?

- ज्यांना यापूर्वी कोरोनाची लागण होऊन गेली असेल तर आवश्यकतेनुसार नियमित चाचण्या करून घ्याव्यात.

- लसीकरण सामान्यांपर्यंत पोहोचायला काही कालावधी लागू शकतो. तोवर वैयक्तिक आणि सामाजिक सुरक्षेचे सर्व नियम पाळावेत.

- कामावर रुजू झाल्यावर हात साबण आणि पाण्याने वारंवार धुवा. साबण आणि वाहणारे पाणी अनुपलब्ध असल्यास, कमीत कमी ६०% अल्कोहोल-आधारित हँडरब वापरा.

- आपले डोळे, नाक किंवा तोंड न धुतलेल्या हातांनी स्पर्श करणे टाळा.

- खोकताना आणि शिंकताना तोंडावर समोर रुमाल धरा.

- आजारी असलेल्या लोकांशी जवळचा संपर्क टाळा.