शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

मोफत पार्किगला अधिसभेत विरोध

By admin | Updated: September 28, 2014 00:13 IST

महाविद्यालयांकडून पार्किगच्या नावाखाली विद्याथ्र्याची लूट केली जात आहे. त्यामुळे विद्यापीठाने यात लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

पुणो : महाविद्यालयांकडून पार्किगच्या नावाखाली विद्याथ्र्याची लूट केली जात आहे. त्यामुळे विद्यापीठाने यात लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. शनिवारी विद्यापीठाच्या अधिसभेतही या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. परंतु, अधिसभेतील बहुतांश सदस्यांनी मोफत पार्किगला विरोध केला. त्यामुळे पुढील काळात मोफत पार्किगच्या विषयावर विद्यार्थी संघटनांना पुन्हा एकदा संघर्ष करावा लागणार आहे.
 महाविद्यालयांचे उपन्नाचे साधन बंद होणार असल्याने अधिसभेवर निवडून गेलेल्या संस्थाचालकांनी, तसेच प्राचार्यानी मोफत पार्किगला विरोध केला. परिणामी, विद्यापीठातर्फे पार्किगचा प्रश्न सोडविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालाचे काय होणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
विद्यापीठाने बहि:स्थ अभ्यासक्रम  वाढीव शुल्कावर विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारण्यात आला. परंतु, वाढविलेले शुल्क योग्य असून, त्यांना लवकरच शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले. विद्यापीठाने केंद्र शासनाच्या स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनशी करार केला आहे. परंतु, कौशल्य अभ्यासक्रम केवळ पदव्युत्तर पदवीसाठी सुरू केले आहेत. पदवी अभ्यासक्रमापासूनच कौशल्यावरील अभ्यासक्रम सुरू करावेत, अशी भूमिका अधिसभा सदस्यांनी मांडली. त्याचबरोबर विद्यापीठाच्या आरक्षण कक्षाकडून महाविद्यालयांचे रोश्टर चुकीच्या पद्धतीने तपासून दिले जातात. तसेच रोश्टर तपासून न दिल्यामुळे महाविद्यालयांची शिक्षक भरती रखडली आहे. त्यामुळे संस्थाचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे अधिसभा सदस्यांनी नमूद केले. 
 
सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाशी संलग्न  महाविद्यालयांना स्वायत्तता देण्याचा परिनियम शनिवारी अधिसभेत मंजूर करण्यात आला. त्यामुळे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना स्वायत्त होण्याचा व शिक्षण क्षेत्रत प्रयोग करण्याचा मार्ग सोपा झाला आहे. गेल्या अधिसभेत यावर जोरदार चर्चा झाली होती. तसेच त्यात दुरुस्त्या सुचविण्यात आल्या. अखेर स्वायत्त महाविद्यालयांच्या कायद्याची मंजुरीची प्रक्रिया सुरू झाली.
नगर उपकेंद्रांचा 
प्रश्न सुटणार 
पुणो विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्रांमध्ये विद्याथ्र्यासाठी आवश्यक सोई-सुविधा व मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. युवराज नरवडे व अधिसभा सदस्य डॉ. अरुण पंदरकर यांनी अधिसभेत केली. त्यावर लवकरच विद्यापीठाचे प्रमुख पदाधिकारी नगर केंद्राला भेट देऊन तेथील प्रश्न सोडवतील, असे आश्वासन कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी दिले.