पुणे शहरात चौथ्या 'कॉम्बिंग ऑपरेशन' मध्ये गुन्हेगारांची झाडाझडती, ६२ गुन्हेगारांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 11:21 AM2021-02-26T11:21:19+5:302021-02-26T11:22:27+5:30

पोलिसांकडून ६२ गुन्हेगार अटक, २ पिस्तुल, १४ कोयते, २ तलवारी जप्त

In the fourth combing operation in Pune city, 62 criminals were arrested | पुणे शहरात चौथ्या 'कॉम्बिंग ऑपरेशन' मध्ये गुन्हेगारांची झाडाझडती, ६२ गुन्हेगारांना अटक

पुणे शहरात चौथ्या 'कॉम्बिंग ऑपरेशन' मध्ये गुन्हेगारांची झाडाझडती, ६२ गुन्हेगारांना अटक

Next

पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी गेल्याकाही महिन्यात चौथ्यांदा कॉम्बिंग ऑपरेशन करुन गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. त्यात विविध कारणावरुन तब्बल ६२ गुन्हेगारांना अटक करण्यात आली. या गुन्हेगारांकडून २ पिस्तुले, १४ कोयते, २ तलवारी जप्त केल्या आहेत. तसेच एका आरोपीकडून २ किलो ७६६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

गुन्हे शाखेने बुधवारी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजण्याच्या दरम्यान
कॉम्बिंग ऑपरेशनची कारवाई केली. या दरम्यान, एकूण १३८ गुन्हेगार
तपासण्यात आले. त्यापैकी ८० गुन्हेगार मिळाले. प्रतिबंधक कारवाईच्या एकुण ३३ केसेस करुन ३३ गुन्हेगारांना अटक करुन त्यांचेकडुन एकुण १ लाख ८३ हजार ४८५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे,पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकांनी केली.

पिस्तुल बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून २ पिस्तुले व २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. तर १४ कोयते, २ तलवारी बाळगणार्‍या १६ जणांना अटक केली आहे. तडीपारीचा आदेश भंग करून शहरात वावरणार्‍या ५ तडीपारांना पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, राबविलेल्या कॉम्बिंग ऑपरेशमध्ये अमंली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी २ किलो ७६६ ग्रॅम गांजा जप्त केला असून यावेळी एकाला अटक करण्यात आली आहे. तर तंबाखु जन्य पदार्थ विक्री करणार्‍या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून २६ हजार ६६५ चा माल जप्त करण्यात आला आहे. तर अवैधरित्या दारू विक्री करताना सापडल्याने दोघांना अटक करण्यात आली.

चतुश्रृंगी, कोथरुड, वानवडी, हडपसर पोलिस ठाण्याच्या गंभीर गुन्हयातील पाहिजे असलेल्या एकुण ५ जणांना ताब्यात घेऊन त्यांना संबंधीत पोलिस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे.

शहरात यापुढेही कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येऊन गुन्हेगारांचे
हालचालींवर सक्त नजर ठेवून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

 

Web Title: In the fourth combing operation in Pune city, 62 criminals were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.