शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

बहुली जिल्ह्यातील पहिली ‘डिजिटल’ शाळा

By admin | Updated: September 5, 2015 03:24 IST

लोकसहभाग, स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य, शाळेने घेतलेले कष्ट, शालेय लेझीम पथक आणि विद्यार्थी-शिक्षक यांच्यामुळे बहुलीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही

पुणे : लोकसहभाग, स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य, शाळेने घेतलेले कष्ट, शालेय लेझीम पथक आणि विद्यार्थी-शिक्षक यांच्यामुळे बहुलीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही जिल्ह्यातील तंत्रज्ञानयुक्त पहिली शाळा म्हणून नावारूपाला आली आहे.लेझीमसाठी बक्षीस म्हणून मिळालेला ५० हजार रुपयांचा निधी शालेय विकास कामासाठी वापरण्यात आला. शालेय मंत्रिमंडळाची निवड लोकशाही गुप्त मतदान पद्घतीने दरवर्षी करण्यात येते. बहुली परिसरात वीटभट्टी व ऊस तोडणीसाठी हंगामी मजूर येतात. त्यांच्या मुलांना शिक्षणप्रकियेत सहभागी करून घेतले जाते. इतर माध्यमाच्या शाळेतील मुलांना येथे प्रवेश दिला जातो. शाळेच्या जडणघडणीसाठी गटशिक्षणाधिकारी ज्योती परिहार, केंद्र प्रमुख प्रणयकुमार पवार, मुख्याध्यापक सोमनाथ म्हेत्रे व सहशिक्षक अर्चना दळवी, किरण काळे, ज्ञानेश्वर वाघमारे, पाटील बबन गायकवाड, सरपंच बंडोबा पिसाळ, दत्तात्रय भगत, बापूसाहेब दिसले, अंकुश कांबळे, रावसाहेब गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, दीपक मानकर, गणपत भगत, नंदकुमार घाटे, राजेंद्र भगत, बबन भगत, शिवाजी किर्वे, चंद्रकांत किर्वे, खंडू भगत आदींनी सहकार्य केले.शाळेला एप्रिल २०१४मध्ये आयएसओचा बहुमान मिळाला. मुख्याध्यापक सोमनाथ म्हेत्रे यांनी ग्रामस्थांना डिजिटल स्कूल ही संकल्पना समजावून सांगितली. ग्रामस्थांनी मंदिर जीर्णोद्धारासाठी जमा केलेला ५ लाख रुपयांचा निधी शाळेला दिला. तसेच शैक्षणिक दर्जा बरोबरच शाळेचा भौतिक दर्जाही सुधारला. शुक्राचार्य वांजळे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वर्ग खोल्या, किचन शेड, टॉयलेट्स, मैदान, आवार भिंत यासाठी निधी उपलब्ध करून दिला. तसेच रोटरी क्लब परिवर्तन प्रतिष्ठान, बहुली ग्रामपंचायत व काही दानशूर व्यक्ती यांच्याकडून खेळणी, फर्निचर, लॅपटॉप आदींसाठी निधी गोळा केला.डिजिटल स्कूल संकल्पनेमध्ये ई-लर्निंग प्रोजेक्टर, स्मार्ट बोर्ड, सुसज्ज वातानुकूलित संगणक कक्ष, मुलांसाठी टॅब, आकर्षक सौर तारांगण तयार करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने सजावट, तरंगते वाचनालय, सीसीटीव्ही कॅमेरे, अत्याधुनिक प्रयोगशाळा, आकर्षक बाग, सोलर लॅब आदी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.