शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

केडगाव स्टेशन परिसरात पहाटे गोळीबार; जमिनीच्या वादातून प्रकार, नागरिकांमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 15:18 IST

लोकवस्तीमध्ये अशा प्रकारे गोळीबार झाल्यामुळे नागरिकांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे

केडगाव: केडगाव (ता. दौंड) : केडगाव स्टेशन परिसरात शनिवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. मध्यवस्तीतील या घटनेमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक माहितीनुसार जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

केडगाव पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर वागज यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका व्यक्तीने हवेत गोळीबार केल्याची चर्चा परिसरात आहे. पहाटेच्या शांततेत अचानक गोळीबाराचे आवाज ऐकू आल्याने परिसरातील नागरिक दचकले आणि अनेक जण घराबाहेर येऊन काय घडले याची माहिती घेऊ लागले. लोकवस्तीच्या भागातच हा प्रकार घडल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. संबंधित व्यक्तींची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

दरम्यान, लोकवस्तीमध्ये अशा प्रकारे गोळीबार झाल्यामुळे नागरिकांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. या घटनेचा सखोल तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Firing in Kedgaon over land dispute; tension grips residents.

Web Summary : Firing in Kedgaon station area sparked panic. Land dispute suspected. Police investigating after shots fired in residential area. Residents demand strict action.
टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेpassengerप्रवासीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSocialसामाजिक