शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

लोहगाव येथील फर्निचर कारखान्याला आग; दीड तासाने आगीवर नियंत्रण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 16:43 IST

या आगीत फर्निचर कारखान्यातील सर्व लाकडी साहित्य जळून झाले खाक

ठळक मुद्दे20 ते 25 अग्निशमन दलाच्या जवानांनी आणली आग आटोक्यात

पुणे : लोहगाव येथील एका फर्निचर कारखान्याला मंगळवारी सकाळी आग लागली. या आगीत फर्निचर कारखान्यातील सर्व लाकडी साहित्य जळून खाक झाले. त्यासोबतच शेजारी असणारे गॅरेज व आणखी एक दुकानाचे नुकसान झाले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे दोन ब्राउजर, दोन फायर गाड्या,  एक देवदूत तसेच एअरफोर्सच्या तीन बंबाच्या साहाय्याने सुमारे दीड तासाने आग आटोक्यात आली.   मंगळवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास लोहगाव- वाघोली रोड येथील पेट्रोल पंपाजवळ असणाऱ्या खासगी जागेतील फर्निचर कारखान्याला आग लागली होती. घटनास्थळी तात्काळ येरवडा अग्निशमन दलाच्या फायर गाडीसह  अग्निशमन अधिकारी सुभाष जाधव व येरवडा अग्निशमन विभागाचे कर्मचारी रवाना झाले. प्रत्यक्ष घटनास्थळी आगीचा प्रकार मोठा होता,  त्यामुळे मदतीसाठी मुख्य अग्निशमन दलाच्या स्टाफ सह नायडू अग्निशमन केंद्र तसेच एअर फोर्स विभागाच्या अग्निशमन यंत्रणेची मदत घेण्यात आली. सुमारे दीड तासानंतर ही आग आटोक्यात आली. या आगीत फर्निचर कारखान्यातील सर्व लाकडी साहित्य जळून खाक झाले. त्यासोबतच शेजारी असणाऱ्या आणखी एक दुकानासह गॅरेजचे  देखील नुकसान झाले आहे. सहायक अग्निशमन अधिकारी रमेश गांगड,  स्टेशन ऑफिसर विजय भिलारे,  केंद्रप्रमुख सुभाष जाधव यांच्यासह 20 ते 25 अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यासह पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपासाच्या सूचना दिल्या. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी  आगीचा घटनेची नोंद घेतली असून नेमकी आग कशामुळे लागली याचा तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दल