शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

पैशाच्या हव्यासापोटी केला वडिलांचा खून

By admin | Updated: September 24, 2015 02:56 IST

पैशाच्या लालसेने एकुलत्या एका मुलाने झोपेत असलेल्या वडिलांचा मानेवर कोयत्याने सपासपा वार करून निर्घृण खून केला.

भोर : पैशाच्या लालसेने एकुलत्या एका मुलाने झोपेत असलेल्या वडिलांचा मानेवर कोयत्याने सपासपा वार करून निर्घृण खून केला. ही घटना आज पहाटे दीडच्या सुमारास वेळवंड (ता. भोर) गावातील गायमाळ वस्तीत घडली. हरीभाऊ नाना पांगूळ (वय ६५) यांचा यात जागीच मृत्यू झाला. भोर पोलिसांनी आरोपी संतोष हरीभाऊ पांगूळ याला अटक केली असून, आज भोर येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. याबाबत भोर पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, भोरपासून ३० किलोमीटरवर भाटघर धरणाच्या काठावर असलेल्या वेळवंड गावातील गायमाळ ही आठ ते दहा घरांची वाडी आहे. येथील हरीभाऊ नाना पांगूळ यांनी दीड वर्षापूर्वी आपली वडिलोपार्जित जमीन विकली होती. यातील एक लाख रुपये मुलगा संतोष हरीभाऊ पांगूळ याला त्यांनी दिले होते. मात्र, संतोष काहीच काम करीत नसल्याने हे पैसे संपल्याने वडिलांकडे त्याने पुन्हा पैशाचा तगादा लावला होता. वडील त्याला पैसे देत नव्हते. याचा राग धरून मंगळवारी रात्री घरात वडील झोपल्यावर सुमारे दीडच्या सुमारास संतोषने झोपेतच कोयत्याने वडिलांच्या मानेवर वार करून त्यांचा खून करून पळून गेला.दरम्यान, पोलिसांना खबर मिळाल्यावर ते घटनास्थाळी गेले. मात्र, तेथे आरोपी न सापडल्याने त्याचा पाठलाग केला. भोर-पांगारी मार्गे भोरकडे येत असताना त्याला पहाटेच अटक केली. आज दुपारी भोर येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. मृत हरीभाऊ यांना संतोष हा एकुलता एक मुलगा आहे. त्याचे लग्न झालेले असून त्याला मुलेही आहेत. मात्र, तो कोहीच कामधंदा करीत नसल्याने खर्चासाठी वडिलांकडे वारंवार पैशांची मागणी करीत असे.पैसे मिळाले नाही, तर त्यांना मारहाण करीत असे. (वार्ताहर)