एक्साईज विभागाने पकडली आंतर जिल्हा मद्य तस्कर टोळी; सोलापूर, साताऱ्यात छापेमारी, २० लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 11:29 IST2026-03-30T11:27:55+5:302026-03-30T11:29:41+5:30

पुणे भरारी पथकाने केलेल्या या कारवाईत २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपींच्या अटकेनंतर सोलापूर, सातारा जिल्ह्यांत छापे टाकून तस्करीची साखळीच उखडून टाकली

Excise department arrests inter-district liquor smuggling gang; Raids in Solapur, Satara, seized goods worth Rs 20 lakh | एक्साईज विभागाने पकडली आंतर जिल्हा मद्य तस्कर टोळी; सोलापूर, साताऱ्यात छापेमारी, २० लाखांचा मुद्देमाल जप्त

एक्साईज विभागाने पकडली आंतर जिल्हा मद्य तस्कर टोळी; सोलापूर, साताऱ्यात छापेमारी, २० लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे: राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने (एक्साईज) आंतर जिल्हा मद्य तस्कर टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी गोव्यातील स्वस्त दारू प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरून महाराष्ट्रात आणायची आणि नामांकित ब्रँडच्या बाटल्यांमध्ये भरून राज्यात चढ्या दराने विक्री करायची. इंदापुरात थरारक पाठलाग करून ही कारवाई करण्यात आली आहे.

पुणे भरारी पथकाने केलेल्या या कारवाईत २० लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपींना अटक केल्यानंतर सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांत छापे टाकून तस्करीची साखळीच उखडून टाकली आहे. प्रेम सोमनाथ भडवलकर (रा. बारामती), अक्षय अधिकराव देशमुख (रा. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला कांदलगाव (ता. इंदापूर) हद्दीत दारूची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार २७ मार्चला दुपारी कांदलगाव ते शहा रस्त्यावर एका मालवाहू वाहनाला अडवण्यात आले. या वाहनाची झडती घेतली असता, त्यात मद्याने भरलेले २५ प्लास्टिक ड्रम आणि रॉयल स्टॅग व्हिस्कीची १ हजार ४०० बनावट बुचे मिळून आली. या कारवाईत प्रेम आणि अक्षय यांना जागीच बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर पथकाने तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरविली. आरोपी अक्षय याच्या माढा येथील घरावर छापा टाकला असता, तेथे गोव्यातील विदेशी दारूच्या बाटल्या, रिकाम्या बाटल्या आणि २ हजार बनावट बुचे असा सुमारे ४९ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. तर, सातारा जिल्ह्यातील महिमानगड येथे फरार आरोपीच्या घरावर छापा टाकला. या ठिकाणाहूनही मोठ्या प्रमाणात 'इम्पेरियल ब्ल्यू’ व्हिस्कीच्या बाटल्या आणि बुचे जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे आंतर जिल्हा मद्य तस्करीची मोठी साखळी उखडून टाकण्यात एक्साईज विभागाला यश आले आहे.

 

Web Title : आबकारी विभाग ने अंतर-जिला शराब तस्करी गिरोह को पकड़ा; ₹20 लाख जब्त

Web Summary : पुणे आबकारी विभाग ने एक अंतर-जिला शराब तस्करी गिरोह का भंडाफोड़ किया, ₹20.53 लाख का माल जब्त किया। गिरोह ड्रम में गोअन शराब का परिवहन करता था, उसे फिर से पैक करता था और ऊंचे दामों पर बेचता था। सोलापुर और सतारा में गिरफ्तारियां हुईं।

Web Title : Excise Busts Inter-District Liquor Smuggling Ring; Seizes ₹20 Lakh

Web Summary : Pune excise officials busted an inter-district liquor smuggling ring, seizing ₹20.53 lakh worth of goods. The gang transported Goan liquor in drums, repackaged it, and sold it at high prices. Arrests were made in Solapur and Satara.