शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांना जिज्ञासाही हवी

By admin | Updated: October 7, 2016 03:22 IST

नवीन उद्योग सुरू करताना जिद्द हवीच. त्याबरोबरच सतत जिज्ञासाही जागी हवी. असा उद्योजक यशाची शिखरे गाठल्याशिवाय राहणार नाही

पुणे : नवीन उद्योग सुरू करताना जिद्द हवीच. त्याबरोबरच सतत जिज्ञासाही जागी हवी. असा उद्योजक यशाची शिखरे गाठल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत मुंबईतील आयआयटीच्या संगणकशास्त्र आणि अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक डॉ. दीपक पाठक यांनी उद्योजकांना गुरुवारी येथे आवाहन केले.महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्रिज अ‍ॅँड अ‍ॅग्रिकल्चरतर्फे विविध क्षेत्रांतील उद्योजकांना पारितोषिके, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ अच्युत गोडबोले प्रमुख पाहुणे होते. चेंबरचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, संचालक अनंत सरदेशमुख व्यासपीठावर होते.संशोधनाबद्दलचे जी. एस. पारखे पारितोषिक मिस्ट रिसोनन्स इंजिनिअरिंग या कंपनीस मिस्ट कूलिंग सिस्टिम या उपकरणाबद्दल देण्यात आले. मकरंद चितळे यांनी तो स्वीकारला. याच शीर्षकाचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मल्टिटेक प्रॉडक्ट्सचे अनिल घुबे पाटील यांनी स्वीकारले. तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक फ्रिक्शन वेल्डिंग टेक्नॉलॉजीजचे यतिन तांबे यांनी स्वीकारला. चवथ्या क्रमांकाचे पारितोषिक युनिव्हर्सल आॅर्बिटल सिस्टिम्सचे आनंद कानडे यांनी स्वीकारला.पाठक यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात उद्योजकांना डिजिटल टेक्नॉलॉजीचा अधिकाधिक वापर करून प्रगती साधण्याचे आवाहन केले. गोडबोले यांनी अद्ययावत माहिती न ठेवल्यास व विपणनाच्या नवनव्या तंत्राचा वापर न केल्यास उद्योग स्पर्धेत मागे कसे पडतात, हे उदाहरणांसह सांगून माहिती तंत्रज्ञानाचा दैनंदिन जीवनात होणाऱ्या उपयोगांची माहिती सांगितली. या नव्या तंत्रज्ञानामुळे जुने व्यवसाय बंद पडत असून, यू-ट्यूब न फ्ल्पिकार्डसारख्या सुविधांमुळे, आॅनलाइन पुस्तके वाचण्याच्या सुविधेमुळे पुस्तकांची दुकाने बंद होत असल्याचा धोका नमूद केला.चौधरी यांचेही प्रास्तविक भाषण झाले. सरदेशमुख यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)अन्य पारितोषिके व विजेते असे ४ हरिमालिनी जोशी पारितोषिक - एन्सेम्बल सिस्टिम्स, मिलिंद कुलकर्णी. रमाबाई जोशी महिला उद्योजक पारितोषिक -लीज ब्युटी सेंटर, लिना खांडेकर. रमाबाई जोशी महिला उद्योजक -इंटरनॅशनल स्कूल आॅफ इस्थेटिक्स, भक्ती सपके.४बी. जी. देशमुख आयएएस अ‍ॅवॉर्डचे मानकरी १) इंडो गल्फ फर्टिलायझर्स, अभिनव सिन्हा, २)आॅर्लिकोन ब्लेझर्स कोटींग, नचिकेत कणसे, ३)ल्युक इंडिया लिमिटेड, शंतनू घोषाल, ४)सोबा लिमिटेड, अभिनव कांचन, ५)विद्या प्रतिष्ठान इन्स्टिट्यूट, अमोल गोजे. किरण नातू फर्स्ट जनरेशन उद्योजकता पुरस्कार १) विनित मराठे, २)ओमप्रकाश पेठे, ३)गजानन पाटील. आर. जे. राठी ग्रीन इनिशिएटिव्हज १) जे. बी. केमिकल्स - श्रीधर जोशी, २)सॅनसेरा इंजिनिअरिंग -जयाकारा शेट्टी.