एकनाथ शिंदेंनी संजय गायकवाड यांचा राजीनामा घ्यावा, नुसती समज देऊन चालणार नाही - असीम सरोदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 17:25 IST2026-04-27T17:24:51+5:302026-04-27T17:25:28+5:30

प्रशांत आबी यांच्या तक्रारीचा पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहे

Eknath Shinde should demand Sanjay Gaikwad's resignation, just giving an explanation will not suffice - Asim Sarode | एकनाथ शिंदेंनी संजय गायकवाड यांचा राजीनामा घ्यावा, नुसती समज देऊन चालणार नाही - असीम सरोदे

एकनाथ शिंदेंनी संजय गायकवाड यांचा राजीनामा घ्यावा, नुसती समज देऊन चालणार नाही - असीम सरोदे

पुणे : संजय गायकवाड यांनी प्रशांत आबी यांना शिवीगाळ केली. अत्यंत वाईट शिव्या दिल्या होत्या त्या संदर्भात आम्ही तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी हा गुन्हा दखलपात्र घेतला नाही. तर अदखलपात्र गुन्हा केला आहे. एकनाथ शिंदे यांनीसुद्धा संजय गायकवाड यांना समज देऊन चालणार नाही. त्यांचा राजीनामा घ्यायला हवा अशी मागणी असीम सरोदे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली आहे. 

सरोदे म्हणाले, आबी यांचे कुटुंब पोलिसाकडे मागणी करत आहेत. मात्र पोलीस गुन्हा दाखल करत नाहीय. गायकवाडांनी या आधी ही बेताल वक्तव्य केली आहेत. या तीन दिवसात साधारण १० हजार प्रती पुस्तकाच्या खपल्या आहेत. आणि याला गायकवाड जबाबदार असतील तर प्रशांत आंबी याना विनंती करणार आहे की, गायकवाड यांना थोडी रॉयल्टी द्यावी. त्यांच्यामुळेच पुस्तकाचा खप वाढला असल्याची मिश्किल टिप्पणी यावेळी सरोदे यांनी केली. राजाराम पोलिस ठाण्यात सतीश खोडगर पोलीस निरीक्षक यांना लीगल नोटीस पाठवली आहे की या गुन्ह्याचा दखलपात्र म्हणून नोंद करावी. या आधी ही छोट्या छोट्या घटनेत दखलपात्र गुन्हे नोंद झाले आहेत. 

पोलिसांवर दबाव आणण्यात आलाय 

देवेंद्र फडणवीस हेच मुख्य विधी सल्लागार आहेत त्यामुळे त्यांनी सांगितले असावे. विरोधी पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात काही पोस्ट केल्या तर त्यावर लगेच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काहींना अटक ही करण्यात आली आहे अशी अनेक उदाहरण आहे. गायकवाड यांनी तर स्पष्टपणे शिवीगाळ केली आहे तरी गुन्हा का दाखल होत नाही. गायकवाड याना बुलढाणा पोलिसांनी तातडीने अटक करून कोल्हापूर पोलिसांच्या स्वाधीन करावे. प्रशांत आबी याना अजूनही धमकीचे कॉल येत आहेत. प्रशांत आबी यांच्या तक्रारीचा पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही सरोदे यांनी यावेळी दिला आहे. 

Web Title : संजय गायकवाड़ का इस्तीफा लिया जाए, केवल चेतावनी नहीं: सरोदे

Web Summary : असीम सरोदे ने संजय गायकवाड़ के इस्तीफे की मांग की है। पुलिस कार्रवाई पर सवाल। धमकी जारी, पुलिस प्राथमिकी दर्ज नहीं करती है तो उच्च न्यायालय में जाने की धमकी।

Web Title : Sanjay Gaikwad's resignation should be taken, not just a warning: Sarode

Web Summary : Asim Sarode demands Eknath Shinde take Sanjay Gaikwad's resignation for abuse. Police inaction questioned. Threats continue, High Court action threatened if police don't register FIR.