महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पीएमपीचे पुणे नाशिक रस्त्यावरील सर्व बसमार्ग राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 07:15 PM2018-08-08T19:15:03+5:302018-08-08T19:16:29+5:30

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पीएपीकडून खबरदारी म्हणून चाकणकडे जाणारे बसमार्ग बंद ठेवण्यात अाले अाहेत. तर इतर मार्गांमध्येही बदल करण्यात अाले अाहेत.

due to maharshtra band, some routes of pmp will remain shut | महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पीएमपीचे पुणे नाशिक रस्त्यावरील सर्व बसमार्ग राहणार बंद

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पीएमपीचे पुणे नाशिक रस्त्यावरील सर्व बसमार्ग राहणार बंद

Next

पुणे :  मराठा समाजाच्या अारक्षणाच्या मागणीसाठी उद्या ( 9 अाॅगस्ट) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात अाली अाहे. काही दिवसांपूर्वी चाकण भागातील अांदाेलनाला हिंसक वळण लागले हाेते. यात पीएमपी बसेसचे माेठे नुकसान झाले हाेते. त्यामुळे उद्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पीएमपीने सावध भूमिका घेतली असून शहरातील विविध भागातून चाकणकडे जाणाऱ्या बसेस बंद ठेवण्यात येणार अाहेत. त्याचबराेबर इतर मार्गांमध्येही बदल करण्यात अाले अाहेत. 


    पीएमपीकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात अाली अाहे. यात पाेलीसांकडून शहर व हद्दीलगतच्या परिसरामध्ये तीव्र अांदाेलणाची शक्यता वर्तवल्यामुळे पीएमपीच्या मार्गांचे संचलनात बदल केल्याचे सांगण्यात अाले अाहे. पीएमपीने दिलेल्या माहितीनुसार पुणे नाशिक रस्त्यावरील सर्व बसमार्ग बंद ठेवण्यात येणार अाहेत. पुणे मुंबई रस्त्यावर निगडीच्या पुढे देहूगांव, वडगांव, कामशेत व किवळेकडे जाणारे सर्व बसमार्ग बंद असणार अाहेत. पाैड राेडवरील बसेस या फक्त चांदणी चाैकापर्यंतच धावणार अाहेत. सिंहगड रस्त्यावर वडगांव धायरी पर्यंतच बसेस सुरु असणार अाहेत. मांडवी बहूली राेडने संचलनात असणारे बसमार्ग वारजे माळवाडी पर्यंतच सुरु असणार अाहेत. पुणे सातारा रस्त्यावर कात्रज पर्यंतच बसेस धावणार अाहेत. बाेपदेव घाट मार्गे जाणारे सर्व मार्गावरील बससेवा येवलेवाडी पर्यंत सुरु असणार अाहे. हडपसर रस्त्यावरुन जाणारे सर्व बसमार्ग फुरसुंगी पर्यंतच सुरु असतील. तर साेलापूर रस्त्याने जाणारे सर्व बसमार्ग हे शेवाळवाडी अागारापर्यंतच सुरु असतील. नगरराेडवरुन धावणाऱ्या बसेस या वाघाेली पर्यंतच असणार अाहेत. काेलवडी, साष्टे मार्गे जाणारा बसमार्ग बंद ठेवण्यात येणार अाहे. मरकळ हा बसमार्गही बंद असणार अाहे. तर निगडी ते चाकण अाणि वडगाव, चाकण रस्त्यावरील सर्व बसमार्ग बंद असणार अाहेत. 

Web Title: due to maharshtra band, some routes of pmp will remain shut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.