शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Bandha: पुण्यात आंदोलनामुळे फातिमानगर चौकातील सोलापूर रस्ता जाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 12:32 IST

वानवडीतील महाविकास आघाडीच्या वतीने संविधान चौकात 'संविधानाच्या' प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन 'महाराष्ट्र बंद' च्या रॅलीला सुरुवात झाली.

ठळक मुद्देकार्यकर्ते दुकाने बंद करण्याचे करत होते आवाहन

पुणे : वानवडीतील महाविकास आघाडीच्या वतीने संविधान चौकात 'संविधानाच्या' प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन  (Maharashtra Bandha) च्या रॅलीला सुरुवात झाली. अनुचित प्रकार घडू नये म्हणून वानवडी पोलीसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आझादनगर, साळुंखे विहार, केदारीनगर, शिवरकर रस्त्यावरुन काढण्यात आलेल्या या दुचाकी रॅलीत, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेने पदाधिकारी कार्यकर्ते हे रस्त्यांवरील अत्यावश्यक सेवेतील व इतर दुकाने बंद करण्याचे आवाहन करत होते. 

पुढे ही रॅली मुख्य सोलापूर रस्त्यावरील फातिमानगर चौकात आल्याने सोलापूर रस्त्यावरील वाहतूक खोळंबून रस्ता जाम झाला. रँलीत तिन्ही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते गटागटांनी सहभागी झाले होते. काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर रॅलीत सहभागी झाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक शिवाजी केदारी, अभिजित शिवरकर, साहिल केदारी आणि कार्यकर्ते यांच्या मोदी सरकार विरुद्ध घोषणाबाजीत रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाली. काही वेळानंतर वानवडीतील जनजीवन पुर्वपदावर आल्याचे पहायला मिळाले. 

''लखीमपुर (lakhimpur) येथे घडलेली घटना निंदनीय असून संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे. तेथे घडलेल्या घटनेमुळे महाराष्ट्र बंद करुन महाराष्ट्रातील व्यापारी, व्यावसायिकांना वेठिस धरणे चुकीचे वाटते. वानवडीमध्ये व्यापारी असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र बंद ला पाठिंबा नाही. परंतु दडपशाहीमुळे व्यापारीवर्गांनी आपली दुकाने बंद ठेवली होती असे वानवडी व्यापारी असोसिएशनचे  अध्यक्ष महेश पुंडे यांनी सांगितले.'' 

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदGovernmentसरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना