होळी, धुळवडीला मद्यप्राशन करून वाहन चालवण्याची डेरिंग; पुण्यात ४५५ चालकांना घेतले जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 15:52 IST2026-03-05T15:51:53+5:302026-03-05T15:52:15+5:30

होळी, धुळवडीला अनेक जण मद्य प्राशन करून वाहन चालवतात, मद्यपी चालकांमुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात

Drunk driving during Holi, Dhulwadi; 455 drivers caught in Pune | होळी, धुळवडीला मद्यप्राशन करून वाहन चालवण्याची डेरिंग; पुण्यात ४५५ चालकांना घेतले जाळ्यात

होळी, धुळवडीला मद्यप्राशन करून वाहन चालवण्याची डेरिंग; पुण्यात ४५५ चालकांना घेतले जाळ्यात

पुणे : होळी, तसेच धुळवडीच्या दिवशी मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या दुचाकीस्वार तसेच चारचाकी चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी नाकेबंदी करून विशेष कारवाई (ड्रंक अँड ड्राइव्ह) केली. मोटार वाहन कायद्यान्वये ४५५ मद्यपी वाहनचालकांवर खटले दाखल करण्यात आले.

होळी, धुळवडीला शहराच्या विविध भागांत पार्ट्यांचे आयोजन केले जाते. अनेक जण मद्य प्राशन करून वाहन चालवतात. मद्यपी चालकांमुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून शहरातील वेगवेगळ्या भागांत नाकेबंदी केली. मंगळवारी (दि. ३) शहरातील प्रमुख चौक, महामार्ग, तसेच गर्दीच्या ३० ठिकाणी नाकेबंदी केली. लोखंडी कठडे लावून (बॅरिकेड्स) तपासणी केली. ब्रीथ अनालायझर यंत्राच्या साहाय्याने वाहन चालकांची तपासणी केली. तपासणीत ४५५ चालकांनी मद्य प्राशन केल्याचे उघडकीस आले. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.

मद्यप्राशन केलेल्या चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आल्यानंतर त्यांना बुधवारी (दि. ४) येरवडा येथील वाहतूक शाखेच्या मुख्य कार्यालयात बोलावण्यात आले. वाहतूक शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे समुपदेशन केले. मद्यपी वाहनचालकांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, या दृष्टीने न्यायालयीन कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांविरोधात कारवाई तीव्र केली. गेल्यावर्षी शहरात पाच हजारांहून जास्त मद्यपी वाहनचालकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. यापुढील काळात मद्यपी वाहनचालकांविरोधात नियमित कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

Web Title : होली पर पुणे पुलिस की कार्रवाई: शराब पीकर गाड़ी चलाने वाले 455 पकड़े गए

Web Summary : होली और धुलवडी पर पुणे पुलिस ने शराब पीकर गाड़ी चलाने वाले 455 चालकों को गिरफ्तार किया। दुर्घटनाओं को रोकने के लिए विशेष चौकियां स्थापित की गईं। मामले दर्ज किए गए हैं, और परामर्श सत्र आयोजित किए जा रहे हैं। हाल की दुर्घटनाओं के बाद पुलिस शराब पीकर गाड़ी चलाने वालों के खिलाफ कार्रवाई तेज कर रही है।

Web Title : Pune Police Crackdown: 455 Drivers Nabbed for Drunk Driving on Holi

Web Summary : Pune police arrested 455 drivers for drunk driving during Holi and Dhulwadi. Special checkpoints were set up to curb accidents. Cases have been filed, and counseling sessions are being held. Police are intensifying action against drunk drivers after recent accidents.