शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

भावकी, गावकी, धर्म, जात, पंथ पाहू नका; शेतकरी हीच जात मानून मतदान करा; अजित पवारांची भावनिक साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 12:37 IST

कारखान्याला उद्या दिल्लीमधील मदत लागली तर मी पृथ्वीराज जाचक यांना सोबत घेऊन अमित शहांकडे जाईल आणि मदत आणेल

लासुर्णे / कुरवली ( पुणे ): लोकसभा, विधानसभेला काय झालं याचा विचार करू नका. झालं-गेलं गंगेला मिळालं. भावकी, गावकी, धर्म, जात, पंथ पाहू नका, शेतकरी हीच जात मानून मतदान करा. तुमचा प्रपंच कोणाच्या हातात द्यायचा ते ठरवा, अशी भावनिक साद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घातली.

कुरवली (ता. इंदापूर) येथे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रचारसभा गुरुवारी (ता. १५) पार पडली. यावेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, पृथ्वीराज जाचक उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, मागे सोमेश्वर कारखानाही असाच अडचणीत आला होता. त्यामध्ये प्रयत्नपूर्वक नियोजन करून तो राज्यात पहिल्या पाचमध्ये आला. कारखाना पहिल्या पाचमध्ये आपल्याला आणायचा आहे. जाचक यांच्यासमवेतचे मागचे राजकीय संबंध सोडून दिले. ते माझ्या स्वार्थासाठी सोडले नाहीत, तर २२ हजार सभासदांसाठी ते सोडले. आपल्याला शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासह कामगारांना नियमित पगार देणे आवश्यक आहे. माझ्यासह दत्तात्रय भरणे यामध्ये मदत करू शकतात, केंद्राची मदत आपण मिळवू शकतो. कारखान्याचे गतवैभव आणायची धमक आमच्या तिघांमध्ये आहे. याच मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो आहोत. यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. यंदा भावी संचालकांना कारखान्याची गाडीदेखील मिळणार नाही. चहापाण्याशिवाय काहीच मिळणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. काही गावांना उमेदवारी देताना मर्यादा असल्याने प्रतिनिधित्व देणे शक्य झाले नाही. याबाबत योग्य तो मार्ग काढू. उर्वरित दिवसांत आपल्याला चांगले काम करायचे आहे. संबंधितांनी वेड्यावाकड्या प्रकाराला बळी पडू नये. पाच वर्षांत कारखाना जाचक यांच्या नेतृत्वाखाली वरच्या क्रमांकावर आणण्याचे काम करू, असे आवाहन पवार यांनी केले.

प्रत्येकाला अधिकार आहे; पण काहीजण विनाकारण टीकाटिपण्णी करतात. नेहमीच्या आणि आत्ताच्या निवडणुकीत फरक आहे. माझी सुरुवात या कारखान्यापासून झाली; त्यामुळे माझे कारखान्याचे वेगळे नाते आहे. अपेक्षित पद्धतीने कारखाना चालला नसल्याची माझ्यासह सभासदांची खंत आहे. मागील काळात आमच्या काही चुका झाल्या असतील तर त्या पदरात घ्या; पण पुढे अशा चुका करायच्या नसल्याचे पवार म्हणाले. उमेदवारी देताना कोण जवळचा, लांबचा हे पाहिले नाही. सुरुवातीच्या सर्वपक्षीय सभेत सर्वांनाच बोलावलं होत, कोणाच्या घरचे लग्न नव्हते, असा टोलादेखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना लगावला.

मागचं सर्व सोडून आम्ही एकत्र आलोकृष्णा-भीमा स्थिरीकरणाचे पाणी उजनी धरणात घालण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सीएसआरसाठी मोठ्या उद्योगपती यांच्याशी बोललेलो आहे. छत्रपती विद्यालयासाठी मला निधी द्यायचा आहे. देशातील मोठ्या उद्योगपती यांच्याशी माझी ओळख आहे. मी अगोदर यात पडणार नव्हतो; पण विचार केला माझी सुरुवात याच कारखान्यातून झाली. मग बँकेत पोहोचलो, राज्यात ओळख झाली. म्हणून वाटलं की, सभासदांना वाऱ्यावर सोडता येणार नाही; म्हणून मागंच सोडून आम्ही एकत्र आलो. येणाऱ्या दिवसांत अफवा उठतील, त्यावर विश्वास ठेवू नका. कारखान्याला उद्या दिल्लीमधील मदत लागली तर मी पृथ्वीराज जाचक यांना सोबत घेऊन अमित शहांकडे जाईल आणि मदत आणेल, असेही यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक 2024Ajit Pawarअजित पवारAmit Shahअमित शाह