शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांची दादागिरी सहन करू नका : कामठे

By admin | Updated: January 21, 2015 23:09 IST

जनतेच्या विकासकामांसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संघर्षाला सामोरे जाणे काळाची गरज असून सत्ताधाऱ्यांची दादागिरी सहन करु नका,

दौंड : जनतेच्या विकासकामांसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संघर्षाला सामोरे जाणे काळाची गरज असून सत्ताधाऱ्यांची दादागिरी सहन करु नका, असा सल्ला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी कार्यकर्त्यांना दिला.दौंडच्या सहकारभवन येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कामठे बोलत होते.यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार म्हणाले की, येणाऱ्या छोट्या मोठ्या निवडणुकांना कार्यकर्त्यांनी सामोरे जाण्यासाठी ऐकमेकांचे मतभेद विसरणे गरजेचे आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अ‍ॅड. अजित बलदोटा म्हणाले की, भविष्यात संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही कारण तालुक्यात पुन्हा सुडाचे राजकारण सुरु झाले आहे. ज्येष्ठ नगरसेवक नंदू पवार म्हणाले की, दौंड नगर परिषद जनतेच्या भावनांशी खेळत आहे. कारण कुरकुंभ मोरीच्या कामकाजात अडथळा आणण्याचे काम सत्ताधारी मंडळी करीत आहेत. यावेळी सोहेल खान, नागसेन धेंडे, दौलत ठोंबरे, मिलिंद मोरे, मिलिंद साळवे, बन्सीलाल फडतरे यांची भाषणे झाली. या प्रसंगी रामभाऊ टुले, भिवाजी गरदडे, बादशहा शेख, सत्वशील शितोळे, लक्ष्म दिवेकर, उत्तम आटोळे, रंगनाथ फुलारी, मधुकर दोरगे, राजेश गायकवाड, आबासाहेब वाघमारी, अशोक खळदकर, भाऊसाहेब ढमढेरे, हरेश उध्यवराव फुले, रांभिया, पाराजी हंडाळ, शिवाजी ढमाले, यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)वाळूमाफियांचा हैदोसदौंड तालुक्यात सुडाच्या राजकारणाला सुरुवात झाली असून वाळूमाफियांनी हैदोस घातला आहे. दरम्यान आजपावेतो वाळूमाफिया सर्वसामान्यांनावर दादागिरी करत होते मात्र आता वाळूमाफिया पत्रकारांवर दादागिरी करायला लागले ही बाब गंभीर आहे असा प्रश्न बलदोटा यांनी उपस्थित केला. राज्यात युतीचे सरकार आहे. मात्र, या सरकारने दिलेली आश्वासने ही आश्वासनेच राहतील अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांची आणि जनतेची वाईट अवस्था या सरकारने केली आहे. - जालिंदर कामठे,जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी