शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खोटी भांडणे करून फसवू नका

By admin | Updated: February 17, 2017 05:22 IST

मी कोणती विकासकामे केली त्यावर बोलतो. तुम्ही काय केले त्यावर बोला’ असे आव्हान देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे

पुणे : ‘मी कोणती विकासकामे केली त्यावर बोलतो. तुम्ही काय केले त्यावर बोला’ असे आव्हान देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यावर खोटी भांडणे करीत जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी नाशिक महापालिकेत तसेच पुण्यातील मनसेच्या नगरसेवकांनी केलेल्या विविध कामांचे छायाचित्रांच्या साह्याने सादरीकरणही केले. सांगण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही, त्यामुळेच ते एकमेकांवर चिखलफेक करीत असून त्याचा जनतेशी काहीही संबध नाही, असे ते म्हणाले.व्यासपीठावरून पक्षाच्या विकासकामांचे छायाचित्रांसह सादरीकरण करीत प्रचारसभेत एक वेगळाच रंग ठाकरे यांनी भरला. कौटुंबीक अडचणींमुळे प्रचार सभा घेण्यास उशीर झाला असे सुरुवातीलाच स्पष्ट करून ते म्हणाले, ‘‘ मुंबईत २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे, ठाण्यात आहे. पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी १० वर्षे सत्तेत आहेत. इतकी वर्षे सत्ता भोगूनही आता ते पुन्हा आम्ही हे करणार असेच सांगत आहेत. मग इतकी वर्षे काय करत होते, हे त्यांना तुम्ही विचारणार आहात की नाही? ’’कसलीही विकासकामे सांगता येत नाहीत, म्हणून शिवसेना भाजपाने भांडणाची क्लृप्ती शोधली. माझ्या प्रचारसभा सुरू झाल्या व परत त्यांच्यावरचा फोकस निघाला. त्यामुळे आता सामनावर बंदी घाला असे नवे पिल्लू काढले आहे. इतक्या वर्षांच्या सत्तेतही त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीही नाही. मनसेची नाशिकमध्ये फक्त ५ वर्षे सत्ता होती. या ५ वर्षांत काय केले ते पहा, असे सांगत ठाकरे यांनी या कामांचे सादरीकरणच केले. त्याचे निवेदनही त्यांनीच केले. अशाच प्रकारची कामे पुण्यात करू. एकदा संधी द्या. मुळा-मुठेचा काठ आंतरराष्ट्रीय दर्जाचा नाही केला तर मग सांगा, असे ते म्हणाले.ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. ठाकरे यांचे आगमन होईपर्यंत नगरसेविका पुष्पा कनोजिया, रूपाली पाटील, वसंत मोरे, बाबू वागस्कर, किशोर शिंदे या नगरसेवकांची भाषणे झाली. ठाकरे यांच्यासमवेत माजी आमदार बाळा नांदगावकर, सरचिटणीस अनिल शिदोरे, शहराध्यक्ष हेमंत संभूस व अजय शिंदे आदी होते. नगरसेवक बाळा शेडगे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)