शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
4
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
5
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
6
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
7
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
8
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
9
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
10
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
11
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
12
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
13
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
14
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
15
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
16
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
17
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
18
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
19
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी कृषी विभागाचा परदेश दौरा रद्द करण्याची नामुष्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 09:57 IST

आता निकषही बदलले, वयाची, शिक्षणाची अट काढली

पुणे : गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्यासाठी निधीची तरतूद आर्थिक वर्षाच्या शेवटी उपलब्ध करून दिली जात असल्याने हा दौरा रद्द करण्याची नामुष्की कृषी विभागावर ओढविली आहे. कोरोनाचा काळ वगळता गेल्या पाच वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याचा लाभ घेता आलेला नाही. राज्यातील शेतकरी २०१९-२० या आर्थिक वर्षात इस्त्राईलच्या दौऱ्यावर गेले होते. दरम्यान, २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या निवडीचे निकष कृषी विभागाने बदलले असून, शिक्षणाची, तसेच वयाची कमाल अट पूर्णपणे काढून टाकली आहे. यामुळे महिला शेतकऱ्यांना प्राधान्य मिळेल असा दावा कृषी विभागाकडून केला जात आहे.

शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावा यासाठी वेगवेगळे तंत्रज्ञान शेतीत आणले जाते. त्यासाठी राज्य सरकारकडूनही प्रयत्न केले जातात. याचाच एक भाग म्हणून परदेशातील शेती तंत्रज्ञान राज्यातील शेतकऱ्यांना पाहता यावे, यासाठी परदेश दौऱ्यांचे आयोजन केले जाते. यासाठी राज्य सरकारकडून दरवर्षी दोन कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली जाते. मात्र, ही तरतूद उपलब्ध करून देताना आर्थिक वर्षाच्या शेवटी अर्थात मार्च महिन्यात उपलब्ध करून दिली जात असल्याने कृषी विभागाला या शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यावर पाठवता येणे अवघड झाले आहे. याच कारणांमुळे गेल्या दोन वर्षांपासून हा दौरा ऐनवेळी रद्द करावा लागत आहे.

कृषी विभागाने २०२४-२५ या वर्षासाठी १६५ शेतकऱ्यांची निवड केली होती. आता ही निवड रद्द करण्यात आल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. या शेतकऱ्यांना अन्य नवीन शेतकऱ्यांप्रमाणे नव्याने अर्ज करावे लागणार आहेत. राज्यात २०२३-२४ मध्ये मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे राज्य सरकारने आर्थिक तरतूदच उपलब्ध करून दिली नाही. तर २०२४-२५ मध्ये दोन कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीपैकी केवळ १ कोटी ४० लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले. ही तरतूदही ३ मार्च रोजी उपलब्ध करून दिल्याने केवळ २७ दिवसांच्या कालावधीत शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यावर पाठविता येणे शक्य झाले नाही. परिणामी ही तरतूद राज्य सरकारकडे परत पाठवण्याची नामुष्की कृषी विभागावर ओढवली.

दरम्यान कृषी विभागाने या परदेश दौऱ्याच्या निवडीचे २०२४-२५ मधील निकष बदलले आहेत. यापूर्वी शेतकरी किमान बारावी पास असावा व वयोमर्यादा २५ ते ६० असावी, असे निकष होते. मात्र, कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीने हे निकष बदललेले असून आता किमान शिक्षणाची अट व कमाल ६० वर्षे ही वयाची अट रद्द करण्यात आली आहे. तर शेतकऱ्याचे किमान वय २५ असावे लागणार आहे. यामुळे जास्तीत जास्त महिला शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करून घेता येईल, असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी युरोप, ब्राझील, ऑस्ट्रेलिया व थायलंड या देशांमध्ये शेतकऱ्यांना पाठवण्यात येणार होते. आता २०२५-२६ या आर्थिक वर्षात युरोप, इस्त्राईल, चीन, जपान, मलेशिया, व्हिएतनाम, फिलिपाईन्स व दक्षिण कोरिया या देशांचा समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Schemeकृषी योजना