शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

दिल्लीतील प्रदुषणाचा विमान वाहतुकीवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 11:45 AM

पुणे ते दिल्लीदरम्यानची विमानसेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मनस्ताप..

ठळक मुद्देदिल्लीतून पुण्याकडे येणाऱ्या काही विमानांनाही जवळपास दीड ते दोन तास विलंब

पुणे : नवी दिल्ली येथील प्रदुषणामुळे आकाशात धुक्याचा जाड थर तयार झाल्याने रविवारी (दि. ३) विमान वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे पुणे ते दिल्लीदरम्यानचीविमानसेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. दिल्लीतून उड्डाण करणाऱ्या दोन तर पुण्यातून एक विमान जयपुरकडे वळविण्यात आले. तर अनेक विमानांना विलंब झाला. प्रदुषणामुळे नवी दिल्लीमध्ये रविवारी दिवसभर दाट धुके पसरले होते. त्यामुळे जवळच्या अंतरावरील दिसणेही कठीण झाले होते. या स्थितीमुळे वैमानिकांना विमानाचे उड्डाण करणे व उतरविणे अडचणीचे ठरत होते. परिणामी, दिल्ली विमानतळावर ये-जा करणाऱ्या विमानांवर परिणाम झाला. एअर इंडियाच्या निवेदनानुसार, रविवारी सकाळी दाट धुक्यामुळे ३७ विमाने अन्य विमानतळांकडे वळविण्यात आली. तर दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लि.च्या प्रसिध्दी पत्रकामध्येही ही बाब नमुद करण्यात आली आहे. प्रामुख्याने सकाळी ९ ते १ यावेळेत उड्डाणांना मोठा फटका बसला. त्यानंतर या स्थितीत सुधारणा होत गेली.   दरम्यान, पुण्यात ये-जा करणाऱ्या विमानांनाही याचा फटका बसला. दिल्लीतून सकाळी उड्डाण करणारे एअर इंडियाचे आणि इंडिगोचे विमान रद्द करण्यात आले. तसेच पुण्यातून सकाळी ७.३० वाजता उड्डाण केलेले स्पाईस जेटचे विमान जयपुरकडे वळविण्यात आले. दुपारी १.१० वाजता पुण्यातून उड्डाण करणाऱ्या विस्तारा कंपनीच्या विमानाला ४ तास विलंब झाला. तसेच गो एअर, इंडिया, एअर एशिया इंडिया कंपनीची काही विमाने १ ते २ तास उशिराने उ्डाण करत होती. दिल्लीतून पुण्याकडे येणाऱ्या काही विमानांनाही जवळपास दीड ते दोन तास विलंब होत होता. हे वेळापत्रक खोळंबल्याने अहमदाबाद, हैद्राबाद, कोलकाताकडे जाणाºया विमानांनाही विलंब झाल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या. -------------------

टॅग्स :Puneपुणेdelhiदिल्लीairplaneविमान