Pune Water Supply: देखभाल दुरुस्तीच्या कामाला उशीर; पुणे शहराच्या काही भागात सकाळी पाणीपुरवठा बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 10:17 IST2026-01-30T10:16:44+5:302026-01-30T10:17:07+5:30
Water Cut in Pune: गुरुवारी होणाऱ्या देखभाल दुरुस्तीच्या कामाला उशीर झाल्याने शुक्रवारी पुणे शहराच्या काही भागात सकाळी पाणीपुरवठा बंद असल्याची माहिती देण्यात आली आहे

Pune Water Supply: देखभाल दुरुस्तीच्या कामाला उशीर; पुणे शहराच्या काही भागात सकाळी पाणीपुरवठा बंद
Pune Water Cut: पुणे शहर पेठांच्या काही भागात तसेच उपनगरांमध्ये पाणीपुरवठा सकाळपासून बंद असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी विविध जलशुद्धीकरण केंद्रे, टाक्या व पंपिंग केंद्रांमध्ये तातडीची विद्युत व पंपिंग विषयक दुरुस्तीची कामानिमित्ताने पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. तसेच शुक्रवारी सकाळी उशिरा पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली होती. मात्र १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरु झाला नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
गुरुवारी पर्वती नवीन व जुने जलशुद्धीकरण केंद्र, त्याअंतर्गत येणाऱ्या पर्वती एमएलआर, एचएलआर व एलएलआर टाक्या, पर्वती टँक पॉइंट, वडगाव जलशुद्धीकरण केंद्र, राजीव गांधी पंपिंग स्टेशन, लष्कर, चिंचवली, वारजे जलकेंद्र तसेच वडगाव जलकेंद्राशी संबंधित विविध टाक्या व पंपिंग व्यवस्थेची देखभाल व दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामासाठी विद्युत पुरवठा आणि पंपिंग यंत्रणा तात्पुरती बंद ठेवावी लागणार असल्याने शहराचा गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी उशिरा पाणीपुरवठा होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आद्यपही अनेक भागात पाणी आलेले नाही. पाणीपुरवठा ७ ते ८ वाजेपर्यंत सुरळीत होणे अपेक्षित आहे. मात्र १० वाजेपर्यंत पाणी न आल्याने नागरिकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान पाणीपुरवठा विभागाला संपर्क साधला असता त्यांनी देखभाल दुरुस्तीच्या कामाला उशीर झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे पाणी सकाळी १० नंतर सुरु होईल अशी माहिती देण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागाकडून देखभाल दुरुस्तीच्या कामाला उशिरा झाला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.