शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

धोका कायम ! विमानाने सात दिवसांत २१ कोरोनाबाधित प्रवासी आले पुण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 19:52 IST

दुसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे : कोरोनाला अटकाव करण्यासाठी दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्यांतील विमान प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. या चाचणीमध्ये पुण्यात आलेले २१ प्रवासी बाधित आढळून आले आहेत. चाचणी अहवाल नसलेल्या ५०७ प्रवाशांची विमानतळावर चाचणी करण्यात आली होती.

दिवाळीच्या कालावधी देशभरातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे आढळून आले. राज्य शासनाकडून दुसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून कोरोनाला अटकाव करण्यासाठी कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. दि. २५ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. विमान प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे. तर रेल्वे प्रवाशांना लक्षणे दिसल्यास स्थानकावरच अँटीजेन चाचणी केली जात आहे. पुणेविमानतळावर दि. १ डिसेंबरपर्यंत दिल्लीतून सर्वाधिक १२ हजारांहून अधिक प्रवासी पुण्यात आल. त्यापाठोपाठ राजस्थान ९७२ व गुजरातमधील ५६० प्रवासी होती. या कालावधीत गोव्यातून एकही विमान आले नाही.

विमानतळावर दाखल झालेल्या एकुण १३ हजार ७७२ प्रवाशांपैकी ५०७ प्रवाशांकडे आरपीसीआर चाचणीचा रिपोर्ट नव्हता. त्यांची विमानतळावर चाचणी करण्यात आली. त्यापैकी २१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याची माहिती विमानतळ संचालक कुलदीप सिंग यांनी दिली. हे प्रमाण जवळपास ४ टक्के एवढे आहे. चाचणी करतेवेळी यावेळी या प्रवाशांचा संपर्क क्रमांक घेतला जातो. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना व पालिका प्रशासनाला कळवून पुढील कार्यवाही केली जाते.-----------विमानतळावरील चाचण्यांची स्थितीठिकाण एकुण प्रवासीगुजरात ५६०दिल्ली १२,२४०राजस्थान ९७२एकुण १३,७७२आरटीपीसीआर ५०७बाधित २१-----------------

टॅग्स :PuneपुणेairplaneविमानAirportविमानतळcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकार