शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

विरोधी पक्ष संपवून हुकूमशाहीच्या दिशेने देशाची वाटचाल : पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 18:30 IST

पिंपरीमध्ये आयाेजित पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर टीका केली.

पिंपरी : विरोधी पक्ष संपवून हुकूमशाहीच्या दिशेने देशाची वाटचाल सुरु आहे, नोटाबंदी जीएसटीमुळे देशात मंदीची लाट असून केंद्र सरकारच्या नाकार्तेपणामुळे अर्थव्यवस्थेचे नियंत्रण चुकले आहे. वाहन उद्योग क्षेत्रात साडेतीन लाख लोक बेरोजगार झाले आहेत. साडेतीनशेहून अधिक वाहन विक्रीचे शोरुम बंद पडली आहेत. बांधकाम क्षेत्रालाही फटका बसला आहे. यास केंद्र सरकार जबाबदार आहे, अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

पिंपरी-चिंचवड शहरात कार्यक्रमासाठी आल्यानंतर चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, महिला काँग्रेसच्या माजी महिला प्रदेश अध्यक्षा शामला सोनवणे, माजी महापौर कवीचंद भाट, गौतम आरकडे, संजय बालगुडे, मयुर जयस्वाल आदी यावेळी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, ‘‘आर्थिक मंदी रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना न आखल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपच्या नेत्यांचे केवळ निवडणुकांकडे लक्ष आहे. २००८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी जागतिक मंदीतून देशाला सुखरुप बाहेर काढले. मात्र, कोणताही जागतिक अर्थतज्ज्ञ केंद्र सरकारबरोबर काम करायला तयार नाही. नोटाबंदीमुळे नुकसान झाले असून  जीएसटीमुळे विकासदर घसरला आहे. ’’ ‘‘नवीन किती कारखाने सुरु झाले, किती रोजगार निर्मिती झाली याची माहिती दिली जात नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात औद्योगिकघसरण झाली असून परकीय गुंतवणुकीची माहिती दिली जात नाही. व्यापार सुलभतेत महाराष्ट्र ८ व्या क्रमांकावरून १३ व्या क्रमांकावर गेला आहे. औद्योगिक विकासाबाबतची मोगम आकडेवारी न सांगता श्वेत पत्रीका काढावी.’’

पुण्याचे विमानतळ, मेट्रो लांबणीवर का?सरकारवर पुण्याचे विमानतळ का झाले नाही,  मेट्रो लांबणीवर का गेली ? ३० लाख लोकांना रोजगार देण्याचे काय झाले, असे  प्रश्न करीत चव्हाण म्हणाले, ‘‘गृह निर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केलेला घोटाळा, सिडकोतीला घोटाळा, पुण्यातील डीपी घोटाळा, समृध्दी महामार्ग जमीन घोटाळा याबाबत मुख्यमंत्र्यांनी राज्याची दिशाभूल करु नये. केंद्राच्या  कालावधीत राष्ट्रीयकृत बँकांत ७३ हजार कोटींचे घोटाळे झाले आहेत. निरव मोदी, ललीत मोदी, चोकसी यांचे आश्रयदाते कोण आहेत. त्यांची नावे समोर येऊ द्या.’’

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणPoliticsराजकारणBJPभाजपा