शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविकेला गंडविणाऱ्यास अटक

By admin | Updated: July 5, 2016 03:08 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुनीता वाघेरे यांची ६३ लाख १० हजार १२१ रुपयांची फसवणूक करणाऱ्या खासगी विमा कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या पिंपरी पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या.

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुनीता वाघेरे यांची ६३ लाख १० हजार १२१ रुपयांची फसवणूक करणाऱ्या खासगी विमा कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या पिंपरी पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या. ही कारवाई संगमनेर येथे करण्यात आली. दीपक रमेश मोरे (वय ३४, रा. संगमनेर, अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरवाडी चौकात एका खासगी विमा कंपनीचे कार्यालय आहे. तेथे मोरे हा कंपनीचा प्रतिनिधी म्हणून काम करत होता. वाघेरे यांनी या कंपनीत डिसेंबर २००९मध्ये पाच वर्षे कालावधीसाठी पॉलिसी काढली होती. तीन वर्षे त्यांनी नियमितपणे विम्याचे हप्ते भरले. विमा कंपनीतील कर्मचारी आणि बँकेतील कर्मचाऱ्याने संगनमताने त्यांच्या नावाने बनावट बँक खाते उघडले होते. विमा पॉलिसीची बनावट कागदपत्रे तयार केली. सुमारे ६३ लाख १० हजार १२१ रुपयांचा अपहार केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वाघेरे यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी संगमनेर येथे जाऊन मोरे याच्या मुसक्या आवळल्या. (प्रतिनिधी)