शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
3
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
4
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
5
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
6
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
7
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
8
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
9
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
10
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
11
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
12
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
13
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
14
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
15
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
16
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
17
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
18
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
19
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
20
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोना विषाणूचा उद्रेक रोखण्यासाठी सध्या डॉक्टरच ‘फ्रंटफूट’वर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 23:30 IST

सर्वच डॉक्टर, नर्स, डॉक्टरेतर कर्मचारी रुग्णांच्या सेवेसाठी २४ तास कार्यतत्पर

ठळक मुद्देराज्यभरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा तातडीने कामालाराज्यभरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा तातडीने कामालासरकारी आणि खासगी वैद्यकीय यंत्रणेत संवाद हवा

पुणे : कोरोना विषाणूचा उद्रेक होऊ नये यासाठी राज्यभर गर्दी टाळण्याचे, व्यवसाय बंद ठेवण्याचे, खासगी कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा देण्याचे आदेश लागू झाले आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी घरीच थांबण्याचे आवाहन केले जात आहे. दुसरीकडे, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डॉक्टर आणि वैैद्यकीय क्षेत्रातील सर्व कर्मचारी मात्र ‘फ्रंटफूट’वर तत्परतेने कार्यरत आहेत. 
राज्यभरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा तातडीने कामाला लागली आहे. सरकारी रुग्णालयांप्रमाणेच सर्वच डॉक्टर, नर्स, डॉक्टरेतर कर्मचारी रुग्णांच्या सेवेसाठी २४ तास कार्यतत्पर राहताना दिसत आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सर्व प्रकारची खबरदारी घेऊन वैैद्यकीय क्षेत्राचा कोरोनाविरुद्धचा लढा सुुरु आहे. यानिमित्ताने तरी समाजातील डॉक्टरांबद्दलचे नकारात्मक वातावरण कमी व्हावे आणि त्यांच्या कार्याची दखल घेतली जावी, अशी अपेक्षा वैैद्यकीय क्षेत्रामधून व्यक्त होत आहे.
अनेकदा रुग्णाचे हॉस्पिटलमध्ये निधन, उपचारावरील अविश्वास यामुळे नातेवाईक संतप्त होतात. यातूनच रुग्णालयांमध्ये तोडफोड केल्याच्या, डॉक्टरांना मारहाण केल्याच्या घटना घडतात. अशा घटनांमुळे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत जाते. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या निमित्ताने डॉक्टरांची कार्यतत्परता अधोरेखित होत आहे. त्यामुळे समाजामधील त्यांच्याबद्दलचा आकस कमी व्हावा, अशा स्वरुपाचे आवाहन करण्यात येत आहे.
---------
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टर, नर्स, इतर कर्मचारी आपापल्या प्रोटोकॉलप्रमाणे चांगले काम करत आहेत. अशा परिस्थितीत सर्व पदाधिकारी, तसेच नागरिकांनी वैैद्यकीय क्षेत्राला सहकार्य करण्याची गरज आहे. एखादी दुर्दैवी घटना घडली की डॉक्टरांवर हल्ले होतात. त्याबाबत आता कायदाही मंजूर झाला आहे. मात्र, सामान्यांनी थेट डॉक्टरांव हल्ले न चढवता परिस्थितीची खातरजमा करावी. सध्या सर्वच स्तरांवर शासकीय यंत्रणा कोरोनाचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांचे सहकार्य गरजेचे आहे.
- डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्यप्रमुख, पुणे महानगरपालिका
------------
आयएमएच्या माध्यमातून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत जनजागृतीचे प्रयत्न सुरू आहेत. सामान्यांच्या प्रश्नांना उत्तरे, अफवाविरोधी मोहीम असे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. कोणताही साथीचा रोग आला की त्याचा सामना करण्यासाठी डॉक्टर अहोरात्र झटत असतात. त्यांच्या कामाची समाजाकडून दखल घेतली जाणे अपेक्षित आहे. 
- डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, आयएमए
------------
सरकारी आणि खासगी वैद्यकीय यंत्रणेत संवाद हवा
कोरोनाबाबतचे शासनाचे धोरण, त्यांच्याकडून देण्यात येणारे आदेश याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाकडून खासगी डॉक्टरांशी कोणताही संवाद साधण्यात आलेला नाही. खासगी डॉक्टर शासनाला पूर्णपणे सहकार्य करण्यास तयार आहेत. पुढील काही काळामध्ये सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे, पुढील दोन-तीन दिवसांमध्ये आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेणार असल्याचे डॉ. भोंडवे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलState Governmentराज्य सरकार