Join us
Daily Top 2Weekly Top 5

Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 09:19 IST

Hero MotoCorp share price : २०२६ या वर्षात कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना दुसऱ्यांदा असा फायदा दिलाय. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात कंपनीनं प्रति शेअर ११० रुपयांचा लाभांश दिला होता. पाहा कोणती आहे ही कंपनी?

Hero MotoCorp share price : हीरो मोटोकॉर्पनं आपल्या गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनीनं प्रति शेअर ३७५० टक्के लाभांश जाहीर केलाय. २०२६ या वर्षात कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना दुसऱ्यांदा असा फायदा दिलाय. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात कंपनीनं प्रति शेअर ११० रुपयांचा लाभांश दिला होता.

कधी मिळणार फायदा?

कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, २ रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या एका शेअरवर ७५ रुपये लाभांश दिला जाणार आहे. या लाभांशासाठी पात्र गुंतवणूकदार ठरवण्यासाठी २४ जुलै २०२६ ही 'रेकॉर्ड डेट' म्हणून निश्चित करण्यात आली आहे. हीरो मोटोकॉर्प आपल्या भागधारकांना लाभांश देण्यात नेहमीच अग्रेसर राहिली आहे. कंपनीनं २००१ मध्ये पहिल्यांदा प्रति शेअर ३ रुपये लाभांश दिला होता. तेव्हापासून सातत्यानं कंपनी गुंतवणूकदारांना नफ्यातील हिस्सा देत आहे.

पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान

कशी आहे शेअरची कामगिरी?

शेअर बाजारात हीरो मोटोकॉर्पच्या शेअरनं गेल्या काही काळात चांगली कामगिरी केली आहे. गेल्या एका वर्षात या शेअरनं गुंतवणूकदारांना ३९ टक्के परतावा दिलाय. तर तीन वर्षांच्या कालावधीचा विचार केल्यास, या स्टॉकनं १०६ टक्के इतका जबरदस्त रिटर्न दिलाय. सध्या कंपनीचं मार्केट कॅप १.०६ लाख कोटी रुपये असून शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ६,३९० रुपये इतका आहे.

आर्थिक स्थिती आणि रेटिंगमध्ये सुधारणा

ग्लोबल ब्रोकरेज हाऊस 'जेफरीज'नं हिरो मोटोकॉर्पच्या रेटिंगमध्ये सुधारणा करून 'होल्ड' रेटिंग दिलंय. कंपनीच्या आर्थिक निकालांवरून असं दिसतं की, मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक ३० टक्क्यांनी वाढून १४०१ कोटी रुपये झालाय. तसंच कंपनीच्या महसुलातही वार्षिक २९ टक्क्यांची वाढ होऊन तो १२,७९७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Hero MotoCorp offers ₹75 dividend; brokerage raises target.

Web Summary : Hero MotoCorp announces ₹75 dividend per share, record date July 24, 2026. Share performance strong, with 39% return in one year. Jefferies upgrades rating after positive financial results showed net profit up 30%.
टॅग्स :हिरो मोटो कॉर्पशेअर बाजारगुंतवणूकपैसा