Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान

Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान

Petrol Diesel Price: देशात पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती सध्या स्थिर असल्या तरी, त्यामागे तेल कंपन्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 08:47 IST2026-05-09T08:43:42+5:302026-05-09T08:47:23+5:30

Petrol Diesel Price: देशात पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती सध्या स्थिर असल्या तरी, त्यामागे तेल कंपन्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

Will petrol and diesel prices increase? A government decision has hit companies hard; They are losing ₹30,000 crore per month | Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान

Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान

Petrol Diesel Rate: देशात पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती सध्या स्थिर असल्या तरी, त्यामागे तेल कंपन्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. पेट्रोलियम मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, सरकारी तेल कंपन्यांना दरमहा सुमारे ३०,००० कोटी रुपयांची 'अंडर-रिकव्हरी' होत आहे. म्हणजेच कंपन्या महागड्या दरानं कच्चं तेल खरेदी करत आहेत, परंतु ग्राहकांना स्वस्त दरात इंधन विकत आहेत.

पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितलं की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती झपाट्यानं वाढल्या आहेत. कच्चं तेल ७० डॉलर प्रति बॅरलवरून आता १२० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलंय. असं असूनही, सर्वसामान्यांना महागाईपासून वाचवण्यासाठी सरकार पेट्रोल-डिझेलचेदर वाढवत नाहीये. तेल कंपन्यांचा भार कमी करण्यासाठी सरकारनं एक्साईज ड्युटीदेखील कमी केली आहे, ज्यामुळे सरकारला दरमहा सुमारे १४,००० कोटी रुपयांचा महसूल गमवावा लागत आहे.

इराणमधील तणावाचा मोठा परिणाम

पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि 'होर्मुज' सामुद्रधुनीतील संकटामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किमतीत मोठी अस्थिरता दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, जर हा तणाव दीर्घकाळ कायम राहिला, तर भारतातही इंधनाचे दर वाढू शकतात.

देशात पेट्रोल-डिझेलची टंचाई आहे का?

देशात पेट्रोल आणि डिझेलची कोणतीही कमतरता नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. सर्व रिफायनरीज पूर्ण क्षमतेनं काम करत असून इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन दिवसांत सुमारे ९७ लाख एलपीजी सिलिंडर लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत. तसंच ५ किलोच्या लहान सिलिंडरचीही विक्रमी विक्री झाली आहे.

काळाबाजार रोखण्यासाठी कडक पावलं

इंधन आणि एलपीजीचा साठा करणं तसंच काळाबाजार रोखण्यासाठी सरकारनं देखरेख वाढवली आहे. अलीकडेच २०० हून अधिक ठिकाणी आकस्मिक तपासणी करण्यात आली. यामध्ये अनेक वितरकांना नोटिसा पाठवण्यात आल्या असून काहींना दंडही ठोठावण्यात आला आहे, तर एका वितरकाचा परवाना निलंबित करण्यात आलाय.

Web Title : पेट्रोल, डीजल के दाम बढ़ेंगे? कंपनियों को भारी नुकसान।

Web Summary : स्थिर कीमतों के बावजूद, तेल कंपनियों को कच्चे तेल की उच्च कीमतों के कारण भारी नुकसान हो रहा है। सरकार द्वारा बोझ कम करने के प्रयासों में उत्पाद शुल्क में कटौती शामिल है। भू-राजनीतिक तनाव से ईंधन की कीमतें और बढ़ सकती हैं। ईंधन की कोई कमी नहीं; कालाबाजारी के खिलाफ सख्त कदम उठाए गए हैं।

Web Title : Petrol, Diesel Prices Likely to Rise? Companies Face Huge Losses.

Web Summary : Despite stable prices, oil companies face massive losses due to high crude oil prices. Government efforts to reduce the burden include excise duty cuts. Geopolitical tensions could further escalate fuel prices. No fuel shortage reported; strict measures against black marketing are in place.