शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

corona virus ; पुण्यात कोरोना संसर्ग रूग्णांचा आकडा वाढतोय ; शुक्रवारी रात्रीपर्यंत १४ नवीन रूग्ण आढळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 23:49 IST

पुणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून, शुक्रवारी पुण्यामध्ये नव्याने १४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे़.

पुणे : पुणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून, शुक्रवारी पुण्यामध्ये नव्याने १४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे़. दरम्यान नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोना संसर्ग झालेल्या संशयितांना दाखल करण्याची प्रक्रियाही वाढत असून, त्यांचे घशातील स्त्रावांचे नमूने तपासणीसाठी लागलीच प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत़. यापैकी सायंकाळपर्यंत अकरा जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले़ तर रात्री नऊपर्यंत आणखी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे़. दरम्यान कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा हा आकडा येत्या काही दिवसांमध्ये आणखी वाढण्याची भिती वर्तविण्यात येत आहे़ .

पुणे विभागात शुक्रवारी सायंकाळी कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या १०१ होती़ यामध्ये पुणे शहरातील ५१, पिंपरी चिंचवडमधील १४ व जिल्ह्यातील ६ जणांचा समावेश होता़ रात्री उशिरा हाती आलेल्या माहितीनुसार यामध्ये पुणे शहरातील आणखी ३ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ झाली असून, हा आकडा ७४ वर गेला आहे़ या पॉझिटिव्ह अहवालांमध्ये ससून सर्वोपचार रूग्णालयातील ३ जणांचे, नायडू हॉस्पिटलमधील सात जणांचे व तीन खाजगी हॉस्पिटलमधील प्रत्येकी एक जणांचा अहवालाचा समावेश आहे़ गुरूवारपर्यंत संपूर्ण पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची ही संख्या ६० होती ती एका दिवसात १४ ने वाढली आहे़ सध्या नायडू हॉस्पिटलमध्ये संशयित म्हणून दाखल करण्यात आलेल्या ५७ जणांचे तपासणी अहवाल येणे अद्याप बाकी आहेत़

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाHealthआरोग्य