शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

Corona virus : पुणे शहरात रविवारी २७१ नवीन रूग्ण : जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७७५०

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 11:33 AM

पुणे शहरातील हा कोरोनामुक्त होणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या ३ हजार ७८२ इतकी झाली आहे.

ठळक मुद्देआजपर्यंत पुणे शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ६ हजार ४७२ , रविवारी ६ मृत्यू जिल्ह्यात आता पर्यंत 7750 पाॅझिटिव्ह रूग्ण

पुणे : रविवारी पुणे महापालिका हद्दीत कोरोनाबधित रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढला असून, आज तब्बल २७१ नवे कोरोनाबधित रुग्ण विविध हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले. तर आजही कोरोनामुक्त होऊन घरी परतणाऱ्या रुग्णाची संख्या लक्षणीय होती. आज १३८  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, पुणे शहरातील हा कोरोनामुक्त होणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या ३ हजार ७८२ इतकी झाली आहे.    पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज ३५९ जणांचे स्वब तपासणीसाठी प्रयोगशाळे कडे पाठविण्यात आले. त्यापैकी कालचे व आजचे मिळून २७१ जणांचे स्वॅब हे पॉझिटिव्ह आले. यापैकी २०  जण ससून हॉस्पिटलमध्ये, २२१ जण पालिकेच्या नायडू व अन्य आयसुलेशन सेंटरमध्ये तर ३० जण खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहेत. सद्यस्थितीला 173 कोरोनाबधित रुग्णांची प्रकृती गंभीर असून, यापैकी ४२ जण व्हेंटिलेटरवर आहेत.   रविवारी मृत्यू झालेल्या कोरोनाबधित रुग्णांची संख्या ही ६ असून, यापैकी ३ जण ससून हॉस्पिटलमधील तर ३ जण खाजगी रुग्णालयातील आहेत.      ९मार्च पासून आज पर्यंत पुणे शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ही ६ हजार ४७२ इतकी झाली असून, यापैकी अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या ही २ हजार ३७६  इतकी आहे.      रविवारी विविध तपासणी केंद्रावर ३५९ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले असून, आजपर्यंत स्वॅब रूग्ण संख्या ही ४९ हजार ३२० एवढी झाली आहे. अद्याप प्रयोगशाळेतुन १ हजार ७२ जणांचे अहवाल येणे बाकी आहे.

..............................

पुणे जिल्ह्यात एका दिवसांत 285 नवीन कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात लाॅकडाऊन शिथिल होत असतानाच कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवार (दि.31) रोजी जिल्ह्यात 285 नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. यामुळे आता पर्यंत कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या 7 हजार 750 वर जाऊन पोहचली आहे. तर रविवारी एका दिवसांत 8 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला. यामुळे कोरोनामुळे बळी गेलेल्या रुग्ण संख्या 337 वर जाऊन पोहचली आहे.शहरी भागासोबतच आता ग्रामीण भागात कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत असताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत प्रशासनाचे बहुतेक सर्व लक कन्टमेन्ट झोनवर आहे. परंतु 17 मे नंतर पुणे शहरासह ग्रामीण भागात दररोज नवीन भागात कोरोना बाधित रुग्ण सापडत आहे. आता कन्टमेन्ट झोनच्या बाहेर देखील कोरोनाच्या तपासण्याचे प्रमाण वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. रविवार जिल्ह्यात 285 नवीन रुग्णांची भर पडली. यामध्ये सर्वाधिक पुणे शहरातील आहेत. तर पिंपरी चिंचवड मध्ये 9 आणि ग्रामीण भागात 8 नवीन रूग्ण सापडले आहेत. शहरी भागात काही प्रमाणात संख्या कमी होताना दिसत आहे. तर ग्रामीण भागात हीच संख्या वाढताना दिसत आहे. ------ एकूण बाधित रूग्ण : 7759पुणे शहर : 6537पिंपरी चिंचवड : 521कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : 683मृत्यु : 337 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका