शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 2:13 PM

Jammu and Kashmir Firing : जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा गोळीबाराच्या घटना घडत आहे. शनिवारी अज्ञातांनी एका मिठाईच्या दुकानावर गोळीबर केल्याचा प्रकार समोर आला.

Jammu and Kashmir : जम्मू काश्मिरमध्ये पुन्हा एकदा हिंचाराच्या घटनांनी डोकं वर काढलं आहे. त्यामुळे परत भारतातील सर्वात सुंदर शहर अत्यंत संवेदनशील आणि अस्थिर क्षेत्र बनत आहे. अशातच जम्मू-काश्मीरमधील मीरान साहिब भागात एका मिठाईच्या दुकानावर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला. धक्कादायक बाब म्हणजे हल्ल्यानंतर एका व्यक्तीने याची जबाबदारी घेत इशारा दिला आहे.

जम्मू-काश्मीरमधील मीरान साहिब भागात शनिवारी संध्याकाळी एका मिठाईच्या दुकानावर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी अचानक गोळीबार केला. हल्ल्याच्या वेळी काही अज्ञातांनी मिठाईच्या दुकानाजवळ पोहोचताच गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोराने तिथून पळ काढला. गोळीबाराच्या घटनेनंतर जम्मू पोलिसांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, एका मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी मिठाईच्या दुकानावर गोळीबार करून पळ काढला.या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी हल्लेखोरांची शस्त्रे जप्त केली आहेत. याप्रकरणी मीरान साहिब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरीकडे गोळीबाराच्या घटनेनंतर अब्बू जट नावाच्या सोशल मीडिया हँडलवरून या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली. "आज जे काही झाले, त्याची जबाबदारी आम्ही घेतो. मीरा साहिब खजुरिया येथील मिठाईच्या दुकानाबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या. आमच्या म्हणण्याकडे लक्ष दिले नाही तर ते आणखी वाईट होऊ शकते. आम्ही इथे आहोत पण आमचे भाऊ अजूनही तिथेच आहेत. त्यामुळे चूक करू नका आणि ती स्वीकारा. आम्ही नवीन वळण घेतले असून शांततेसाठी प्रयत्नशील आहोत. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढची गोळी हवेत झाडली जाणार नाह," असे या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, १७  एप्रिल रोजी संध्याकाळी काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारामध्ये दहशतवाद्यांनी एकावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात बिहारमधील रहिवासी शंकर शाह यांचा मृत्यू झाला. त्याआधी  ८ एप्रिल रोजी दक्षिण काश्मीरमधील शोपियानमधील पदपवन येथे दहशतवाद्यांनी परमजीत सिंग यांना गोळ्या घातल्या. ते दिल्लीचे रहिवासी होते. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरCrime Newsगुन्हेगारीSocial Mediaसोशल मीडिया