शहरं
Join us  
Trending Stories
1
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
3
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
4
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
5
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
6
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
7
Panchayat 3 ची झलक बघायची आहे? 'या' दिवशी रिलीज होणार सीरिजचा ट्रेलर
8
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
9
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
10
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद
11
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
12
Success Story: ₹८५० च्या पगारावरून ₹५५,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, नशीब बदलणाऱ्या उद्योजकाची कहाणी
13
पुण्यात पैसे वाटल्याचा धंगेकरांचा आरोप, मुरलीधर मोहोळांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
14
मृणाल दुसानीस इंडस्ट्रीत करणार कमबॅक?; सिनेकरिअरविषयी दिली मोठी हिंट
15
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
16
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
17
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
18
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
19
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
20
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक

'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 2:35 PM

Mohan Bhagwat On Reservation: विरोधक सातत्याने BJP आणि RSS वर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन टीका करत आहेत. अशातच मोहन भागवत यांचे महत्वाचे वक्तव्य समोर आले आहे.

RSS Chief On Reservation : लोकसभा निवडणुकीमुळे देशभरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे भाजप तिसऱ्यांदा सत्तेत परतण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे INDIA आघाडी सातत्याने भाजप आणि RSS वर संविधानाचा मुद्दा उपस्थित करत आरोप करत आहेत. अशातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी रविवारी (28 एप्रिल) आरक्षणाबाबत मोठे वक्तव्य केले.

हैदराबादमधील एका शैक्षणिक संस्थेतील कार्यक्रमाला संबोधित करताना भागवत म्हणाले, 'संघ परिवाराने काही गटांना दिलेल्या आरक्षणाला कधीच विरोध केला नाही. आरक्षण आवश्यक असेल तोपर्यंत वाढवावे, असे संघाचे मत आहे. संघ सुरुवातीपासूनच संविधानानुसार सर्व आरक्षणांना पाठिंबा देत आहे. काही लोक खोटे व्हिडिओ प्रसारित करुन संघाला बदनाम करण्याचा प्रयत्न करातत. आरएसएस आरक्षणाच्या विरोधात आहे आणि आम्ही त्याबद्दल बोलत नाही, असा व्हिडिओ प्रसारित केला जातोय. हे पूर्णपणे खोटं आहे. संघ संविधानानुसार सर्व आरक्षणांना पाठिंबा देते,' अशी प्रतिक्रिया भागवत यांनी दिली.

दरम्यान, लोलकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांचे नेते भाजप आणि आरएएसवर आरक्षण संपवणार असल्याचा आरोप करत आहेत. आरक्षणावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक युद्धादरम्यान मोहन भागवत यांचे हे वक्तव्य महत्वाचे आहे.भागवत यांनी गेल्या वर्षीही नागपुरात बोलताना आरक्षणावर भाष्य केले होते. जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण चालूच राहिले पाहिजे, असे ते म्हणाले होते. 

जोपर्यंत मोदी सरकार आहे तोपर्यंत आरक्षण संपणार नाहीदरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील आरक्षणाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. 'राहुल गांधी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपला आरक्षण संपवायचे असते तर ते कधीच केले असते. काँग्रेस पक्षाने नेहमीच ओबीसी, एससी आणि एसटीच्या आरक्षणावर हल्ला केला आहे. आजही जामिया आणि अलीगढ विद्यापीठात एससी-एसटी आणि ओबीसी आरक्षण नाही. जोपर्यंत मोदी सरकार आहे तोपर्यंत एससी-एसटी आणि ओबीसी आरक्षणावर काहीही होणार नाही', असे आश्वासन शहा यांनी दिले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघreservationआरक्षणlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४