शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Success Story: ₹८५० च्या पगारावरून ₹५५,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, नशीब बदलणाऱ्या उद्योजकाची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 10:20 AM

1 / 7
अॅस्ट्रल पाईप्सला आणखी ओळखीची गरज नाही. विविध प्रकारचे पाईप आणि फिटिंग तयार करणारी ही महाकाय कंपनी आहे. पण, या यशस्वी कंपनीच्या उभारणीत कोणाचा हात आहे हे तुम्हाला माहित आहे का? आज आम्ही तुम्हाला त्यांची ओळख करून देत आहोत.
2 / 7
संदीप इंजिनिअर असं त्याचं नाव आहे. ते अॅस्ट्रल पाईप्सचे संस्थापक आहेत. संदीप इंजिनीअर हे देशातील त्या उद्योगपतींपैकी एक आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीनं आणि निष्ठेने कोट्यवधी रुपयांचे व्यावसायिक साम्राज्य उभं केलं आहे. कोणतीही व्यवसायाची कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना इंडस्ट्रीत यश मिळविणाऱ्यांपैकी ते एक आहेत. एक काळ असा होता जेव्हा ते ८५० रुपयांवर ते नोकरी करत होते.
3 / 7
संदीप इंजिनिअर यांचा जन्म १९६१ मध्ये गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला. व्यवसायातील यशाच्या वाटेवर त्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी कॅडिला लॅबोरेटरीज (आता झायडस लाइफसायन्सेस) येथे प्रोजेक्ट इंजिनीअर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांना महिन्याला केवळ ८५० रुपये तुटपुंजा पगार मिळायचा. संदीप यांनी कंपनीत सुमारे दोन वर्ष काम केलं.
4 / 7
नोकरी सोडल्यानंतर संदीप यांनी १९८१ मध्ये पहिला व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांनी फ्लेवर्ड ईसबगोलचं वितरक होण्याचा पर्याय निवडला. परंतु, व्यवसाय विश्वातील त्यांचं पहिलं पाऊल अपयशी ठरले. दुकानदारांना उधारीवर माल हवा होता. विक्री न झाल्यानं पैसे अडकून पडले. हे संदीप यांच्यासाठी नुकसानकारक ठरलं. पाच हजार रुपयांचे नुकसान झाल्यानं त्यांना आपला व्यवसाय बंद करावा लागला.
5 / 7
संदीप इंजिनीअर या सुरुवातीच्या धक्क्यानं निराश झाले नाहीत आणि त्यांनी नवीन संधींचा शोध सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. कॅडिला हेल्थकेअरचे चेअरमन पंकज पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी श्री केमिकल्स नावाच्या कंपनीच्या माध्यमातून अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रीडिएंट्स (एपीआय) तयार केले. दुर्दैवानं या व्यवसायात त्यांना क्वालिटी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागलं. त्यामुळे संदीप इंजिनीअर यांनाही या व्यवसायातून बाहेर पडावं लागलं.
6 / 7
संदीप इंजिनीअर यांच्या व्यावसायिक प्रवासाला कलाटणी मिळाली जेव्हा त्यांना अमेरिकन कंपनी लुब्रिझोल (तत्कालीन बी. एफ. गुडरिच परफॉर्मन्स मटेरियल्स) सोबत काम करताना सीपीव्हीसी (क्लोरिनेटेड पॉलीविनाइल क्लोराईड) पाईपच्या कार्यक्षमतेबद्दल माहिती मिळाली. भारतीय बाजारपेठेत क्षमता ओळखून ते आपल्या देशात परतले. १९९८ मध्ये त्यांनी अॅस्ट्रल पॉलिटेक्निकची स्थापना केली. यामुळे सीपीव्हीसी पाईप तयार करण्यासाठी परवाने मिळवणारी ही देशातील आघाडीची कंपनी ठरली.
7 / 7
सीपीव्हीसी पाईप व्यवसायाच्या यशामुळे अॅस्ट्रल पॉलिटेक्निकनं २०११ मध्ये आपलं नाव बदलून अॅस्ट्रल पाईप्स असं केलं. संदीप इंजिनीअर यांचा मोठा मुलगा कैरव या बदलामुळे व्यवसायात उतरला. २०१४ मध्ये कैरव यांनी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता सलमान खानला कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर बनवून ब्रँडची व्याप्ती आणखी वाढवली. कंपनीचं वार्षिक उत्पन्न २००७ मधील ६० कोटी रुपयांवरून मार्च २०२३ पर्यंत ५,१०० कोटी रुपयांवर पोहोचलं.
टॅग्स :businessव्यवसायInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी