शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने रोखली पंढरीची वाट; पंढरीला जाणारा पायी सोहळा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 06:06 IST

आतापर्यंत दोनदा वारी निघाली नाही; पण पालख्या पोहोचल्या

पुणे : भूकंप, ढगफुटी, धरणफुटी तसेच प्लेग, कॉलरासारखी साथ यासारख्या आपत्तींंना पाठीवर टाकून टाळ-मृदंगाच्या गजरात ‘ग्यानबा-तुकाराम’चा जयघोष करीत लाखो वारकऱ्यांना सोबत घेऊन विठुरायाच्या भेटीसाठी भूवैकुंठ पंढरीला शेकडो वर्षांहून अधिक काळ न चुकता गेलेल्या आषाढी वारीची वाट यंदा कोरोनाने अडविली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालखी सोहळ्यांचे विश्वस्त यांच्या उपस्थितीत शुक्रवारी येथे झालेल्या बैठकीत आषाढी वारीचा पायी सोहळा रद्द करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका यांच्या पादुका आषाढी वारीच्या एक दिवस आधी म्हणजेच दशमीला पंढरपूरला नेण्यासाठी वाहन, हेलिकॉप्टर किंवा विमानाने घेऊन जाण्याचे पर्याय ठेवण्यात आले, त्यावेळची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार आहे. पायी वारी नाही गेली तरी ‘माऊली’ची श्रीविठ्ठलाशी गळाभेट अशा प्रकारे घडविली जाणार आहे.आषाढी वारी म्हणजे, आनंदे नाचत पंढरीशी जाणारा वैष्णवांचा महामेळा! हा मºहाटी संस्कृतीचा ठेवा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा या सोहळ्याचे काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. ‘वारी चुकू न दे हरी!’ ही समस्त वारकरी संप्रदायाची भावना होती. 

350 वर्षांपूर्वी तुकाराम महाराजांचे पुत्र नारायण महाराज यांनी तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरला नेली. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सुरू झाली, अशी मााहिती जाणकारांनी दिली.

50 हून अधिक पालख्या दरवर्षी पंढरपूरला जातात. त्यात ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या पालख्या महत्त्वाच्या आहेत. दरवर्षी पालखी सोहळ्याच्या वेळी १० लाखांहून अधिक वारकरी पंढरपुरात असतात.

1889 मध्ये प्लेगचा कहर झाला होता तेव्हा वारी निघाली नाही. नंतर १९१८मध्ये फ्लूची मोठी साथ होती, तेव्हाही वारी निघाली नव्हती. मात्र, याबाबत देहू, आळंदी किंवा पंढरपूरमध्ये कसलीही नोंद उपलब्ध नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPandharpurपंढरपूर