कोरोनाचे निर्बंध वाढणार का? आढावा बैठकीत काय म्हणाले अजित पवार...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 06:10 PM2022-01-15T18:10:37+5:302022-01-15T18:29:13+5:30

कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने सर्वांनी मास्क वापरावा असं आवाहनही अजित पवारांनी केला

corona restrictions increase What did Ajit Pawar say in the review meeting pune | कोरोनाचे निर्बंध वाढणार का? आढावा बैठकीत काय म्हणाले अजित पवार...

कोरोनाचे निर्बंध वाढणार का? आढावा बैठकीत काय म्हणाले अजित पवार...

Next

पुणे: राज्याच्या कोरोना नियमावलीत कोणताही बदल करण्यात आला नाही. सर्व नियमांचे कडक पालन केले जाईल. कुणालाही यातून सुट मिळणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी आज कोरोना आढावा बैठकीत सांगितले (corona). कोरोना टेस्टींग किट (corona testing kit) मेडिकलमध्ये उपलब्ध आहे. ज्या मेडिकलमधून अशाप्रकारचे किट विकले जात आहेत तिथं त्या ग्राहकांचे रेकॉर्ड ठेवले जाईल. यामुळे नेमके किती जण कोरोना चाचणी करत आहेत हे समजायला सोपे जाईल असंही पवार म्हणाले

जिल्ह्यात मागील आठवडीच्या तुलनेत पॉझिटिव्हिटी रेट वाढला आहे. ६ टक्क्यांवर असलेला हा रेट १७ टक्क्यांवर हा गेला आहे. मृत्यू दर १.६ टक्क्यांवर गेला आहे. विनामास्क फिरणाऱ्यांकडून ४६ लाखांपेक्षा जास्त दंड करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने सर्वांनी मास्क वापरावा असं आवाहनही अजित पवारांनी केला.

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे-

- पीएमपीएमएममध्ये प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन.

- कोरोनाची तीव्रता कमी करायची असेल तर सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.

- सध्या सर्व वयोगटातील लोकांना कोरोना होतोय. दिलासादायक म्हणजे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण खूपच कमी

-  पुढल्या आठवड्यात कोरोना रुग्णांचा आढावा घेऊन नवीन नियमावलीबद्दल निर्णय घेतले जातील.

- पुणे जिल्ह्यात विमानतळ होणार आहे.

Web Title: corona restrictions increase What did Ajit Pawar say in the review meeting pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.