शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
5
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
6
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
7
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
8
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
9
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
10
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
11
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
12
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
13
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
14
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
15
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
16
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
17
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
18
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
19
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
20
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेस इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी

By admin | Updated: August 20, 2015 02:26 IST

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शहर कार्यकारिणीत बदल करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दोन महिन्यांपूर्वी जाहीर केले होते

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शहर कार्यकारिणीत बदल करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दोन महिन्यांपूर्वी जाहीर केले होते. त्यामुळे इच्छुकांकडून शहराध्यक्षपदासाठी मुंबईला लॉबिंग सुरू आहे. मात्र, शहर कार्यकारिणीत तूर्तास कोणतेही बदल होणार नसल्याचे संकेत काँग्रेसचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश यांनी बुधवारी दिले. त्यामुळे काँग्रेसमधील इच्छुकांचा अपेक्षाभंग झाला. शहरातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला. त्या वेळी शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला होता. परंतु, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी छाजेड यांचा राजीनामा स्वीकारला नाही. मात्र, प्रदेशाध्यक्षपदी दोन महिन्यांपूर्वी अशोक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर पुन्हा शहराध्यक्ष व शहर कार्यकारिणीत बदल करण्याची चर्चा सुरू झाली.खुद्द अशोक चव्हाण यांनी एक महिन्यात बैठक घेऊन शहरातील कार्यकारिणीत फेरबदल करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे गेल्या महिनाभरात शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी चव्हाण व मोहन प्रकाश यांना समर्थकांसह भेटून लॉबिंग सुरू केले होते. शहर काँग्रेसतर्फे आयोजित राजीव गांधी जीवन दर्शन छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी मोहन प्रकाश बुधवारी पुण्यात आले होते. त्या वेळी शहराध्यक्षपदासाठी इच्छुक माजी आमदार रमेश बागवे, मोहन जोशी, उपमहापौर आबा बागुल, नगरसेवक संजय बालगुडे, मुख्तार शेख, संगीता देवकर, नीता रजपूत आदी मोहन प्रकाश यांच्या स्वागतासाठी मोठ्या अपेक्षेने उपस्थित होते. मात्र, शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कोणतीही बैठक न घेता मोहन प्रकाश हे तातडीने कोल्हापूरला कार्यक्रमासाठी रवाना झाले. तसेच, पत्रकारांशी बोलतानाही त्यांनी तूर्तास कोणतीही बदल करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी पडल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.