मावळात शिवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा

By Admin | Updated: February 18, 2017 03:25 IST2017-02-18T03:25:37+5:302017-02-18T03:25:37+5:30

राजकारणात कधी काय होईल, याचा नेम नसतो. याचा प्रत्यय सध्या मावळ तालुक्यात येत असून, जसजशी मतदानाची तारीख जवळ

Congress support in Shiv Sena in Maavali | मावळात शिवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा

मावळात शिवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा

लोणावळा : राजकारणात कधी काय होईल, याचा नेम नसतो. याचा प्रत्यय सध्या मावळ तालुक्यात येत असून, जसजशी मतदानाची तारीख जवळ येऊ लागली आहे, तसतसे राजकारणाचे वारे चित्रविचित्र पद्धतीने वाहू लागले आहे. मावळ तालुक्यात काँग्रेस पक्षाने अधिकृत पत्रक काढत शिवसेनेच्या कुसगाव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सत्यभामा शांताराम गाडे, कुसगाव पंचायत समितीच्या उमेदवार उषा संजय घोंगे, वाकसई पंचायत समितीचे सदस्य बाबू शेळके, चांदखेड पंचायत समितीच्या उमेदवार मनीषा आनंदा मालेकर (केदारी) यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे मावळ तालुका कार्याध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी तसे पत्रक काढले आहे.
कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, संभाजी राक्षे व भरत दळवी यांच्या पाठिंबा पत्रकावर सह्या आहेत. काँग्रेसची कुसगाव जिल्हा परिषद गटात व चांदखेड पंचायत समिती गणात चांगली ताकद आहे. ही ताकद शिवसेनेच्या मागे पूर्ण क्षमतेने उभी करुन शिवसेना उमेदवार निवडून देण्याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. या बदल्यात काही जागांवर शिवसेना काँग्रेसच्या उमेदवारांना मदतीचा समझोता  झाला आहे.(वार्ताहर)

Web Title: Congress support in Shiv Sena in Maavali