शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

लुटीचा बनाव करणारा तक्रारदार अटकेत

By admin | Updated: July 2, 2014 02:42 IST

स्वत:च शिक्रापूर पोलिसांना मध्यरात्री तक्रार दाखल करून गेलेल्या एका अट्टल चोरट्याला शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्या साथीदारास शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेतले.

शिक्रापूर : शिक्रापूर, ता. शिरूर येथील श्री ब्रेव्हरेजेस या मिनरल वॉटर (सिटी कूल) कंपनीचे मालक अमोल येवले यांच्याकडून कच्चा माल पुरवठा करून घेतलेले एक लाख २८ हजार रुपये आपल्या गावातील मित्राला लुटायला सांगून स्वत:च शिक्रापूर पोलिसांना मध्यरात्री तक्रार दाखल करून गेलेल्या एका अट्टल चोरट्याला शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्या साथीदारास शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री एक ते दीडच्या सुमारास शिक्रापूर येथील उद्योजक अमोल येवले यांच्या श्री ब्रेव्हरेजेस या कंपनीत बाटल्यांचा कच्चा माल टाकून शशिकांत नंदू जगधने (वय २५, रा. निंबळक, जि. नगर) हा एक पॅसेंजर घेऊन परत मुथ्था पॉलीमर्स (नगर) येथे चालला असताना येथील मलठण फाट्यावर एक दुचाकीस्वार आडवा आला. त्याने ड्रायव्हर जगधनेसह सहप्रवासी गोरक्ष कल्याण सरोदे (रा. निमगाव सावा) यांना मारहाण करीत गाडीतील १ लाख २८ हजारांची रोकड असलेली बॅग पळवली. ही तक्रार घेऊन जगधने शिक्रापूर पोलिसांकडे रात्री अडीच वाजता आला असता, पोलीस उपनिरीक्षक महादेव पाटील यांनी फिर्याद लिहून घेतली. या घटनेत पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, जगधने याने १ लाख २८ हजार रुपये ताब्यात घेतल्यावर लगेच दुसरा आरोपी नीलेश फंडागळे यालाही बाब कळवली. पोलिसांना खरे वाटावे म्हणून एक प्रवासी पाबळ चौकातून त्याने सोबतही घेतला व घटनेनंतर हाच साथीदार पोलिसांपुढेही सादर केला. जगधने व फंडागळे या दोघांवरही लूटमारीचा गुन्हा दाखल असून, आज शिरूर न्यायालयाने दोघांनाही दोन दिवसांची कोठडी सुनावली. या तपासात वरील पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलीस शिपाई अमोल दांडगे, विशाल गव्हाणे, पोलीस नाईक के. के. गाडेकर, चालक बांगर लहाणू, के . पी. आव्हाड आदींनी विशेष कामगिरी करत चोरट्यांना पकडले.