'त्या' लाल शूजचा सुगावा! मंदिरात आधी देवाला घातलं साकडं, मग चोरलं मंगळसूत्र, ३ आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 15:19 IST2026-05-16T15:19:01+5:302026-05-16T15:19:23+5:30

देवीच्या अंगावरील बेन्टेक्स मंगळसूत्र चोरले, या कृत्य दरम्यान चोरट्याने घातलेले 'लाल रंगाचे शूज' सीसीटीव्हीमध्ये ठळकपणे दिसून आले

Clues to 'those' red shoes! First, the god was given a sakad in the temple, then the mangalsutra was stolen, 3 accused arrested | 'त्या' लाल शूजचा सुगावा! मंदिरात आधी देवाला घातलं साकडं, मग चोरलं मंगळसूत्र, ३ आरोपींना अटक

'त्या' लाल शूजचा सुगावा! मंदिरात आधी देवाला घातलं साकडं, मग चोरलं मंगळसूत्र, ३ आरोपींना अटक

वडगाव आनंद : लग्नाकार्यात लागणाऱ्या महागड्या डीजे सिस्टीमचे ॲम्प्लीफायर, मिक्सर आणि मंदिरांमधील मौल्यवान दागिने चोरणाऱ्या आंतरजिल्हा चोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात आळेफाटा पोलिसांना मोठे यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, बेल्हे येथील मुक्ताई मंदिरात चोरी करण्यापूर्वी मुख्य चोरट्याने आधी देवाच्या पाया पडून दर्शन घेतले आणि नंतर देवीचे मंगळसूत्र लंपास केले होते. मात्र, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या चोरट्याच्या 'लाल रंगाच्या शूज'चा सुगावा आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून आळेफाटा, ओतूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील घारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून साडेतीन लाख रुपये किमतीचा मुद्यमाल जप्त करण्यात आला आहे.

तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तुकाराम पोपट कातोरे (वय २४ वर्षे),  निवृत्ती भाऊसाहेब मेंगाळ (वय २० वर्षे,  अजय किसन मेंगाळ (वय २६ वर्षे) सर्व राहणार (जांभुत बुद्रुक ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) यांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी मिक्सर, डीजे मशीन आणि मंदिरात चोऱ्या झाल्याच्या तक्रारी दाखल होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक विश्वास जाधव  यांनी तपासाची चक्रे फिरवली. तपास करत असताना बेल्हे गावातील प्रसिद्ध मुक्ताई मंदिरातील चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. त्यामध्ये मुख्य चोरटा मंदिरात प्रवेश केल्यानंतर आधी देवाच्या पाया पडताना दिसला, त्यानंतर त्याने देवीच्या अंगावरील बेन्टेक्स मंगळसूत्र चोरले. या कृत्य दरम्यान चोरट्याने घातलेले 'लाल रंगाचे शूज' सीसीटीव्हीमध्ये ठळकपणे दिसून आले. गुन्हेगारी जगतात विशिष्ट गुन्हेगार अशा पद्धतीचे शूज वापरतात, हा धागा पकडून पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास चक्र फिरवले. पोलिसांनी मुख्य आरोपी तुकाराम कातोरे याला निष्पन्न करून त्याच्या मेव्हण्यांसह तिघांना बेड्या ठोकल्या. या धडक कारवाईमुळे आळेफाटा पोलीस ठाण्यातील ३, ओतूर पोलीस ठाण्यातील १ आणि अहमदनगर जिल्ह्यातील घारगाव पोलीस ठाण्यातील १ असे एकूण ५ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.

Web Title : लाल जूते का सुराग: चोर ने प्रार्थना की, मंदिर में चोरी, गिरफ्तार

Web Summary : अंतर-जिला गिरोह मंदिर की चोरी और डीजे उपकरण के लिए पकड़ा गया। चोर ने हार चुराने से पहले प्रार्थना की। लाल जूतों से तीन गिरफ्तारियां हुईं, पांच मामले सुलझे और कीमती सामान बरामद हुआ।

Web Title : Red Shoes Clue: Thief Prays, Steals, Arrested in Temple Case

Web Summary : Inter-district gang busted for temple thefts and DJ equipment. The thief prayed before stealing a necklace. Red shoes led to three arrests, solving five cases and recovering valuables.