शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

सिलेंडरमधून क्लोरीन वायूची गळती; श्वासाच्या त्रासामुळे २५ नागरिक रुग्णालयात दाखल, पुण्यात नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 18:29 IST

क्लोरीन वायूचा सिलेंडर निष्काळजीपणे कोणत्याही प्रकारची उपायोजना न करता मोकळ्या जागेत ठेवला, त्यामुळे विषारी वायू तयार होऊन तो लिकेज झाला आणि हवेत पसरला

पुणे : सिलेंडरमधून क्लोरीन वायूची गळती झाल्याने गंगाधाम रोड, बिबवेवाडी परिसरातील २५ नागरिकांचा जीव धोक्यात आला होता. मात्र वेळीच अग्निशमन दल आणि पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. क्लोरीनमुळे महिला, पुरूष आणि लहान मुले अशा २५ जणांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाल्याने ससून रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

याप्रकरणी, बिबवेवाडी पोलिसांनी व्यावसायिक जागामालक प्रकाश बाबुलाल मुथ्था (वय. ७६, रा. सिटीवूड सोसायटी, सॅलेसबेरी पार्क) आणि व्यवस्थापक साहिल हमीद मुलाणी (वय. २८, रा. अप्पर बिबवेवाडी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरूवारी (दि. ३०) रात्री साडे बाराच्या सुमारास वर्धमान लॉन्सच्या समोर, गंगाधाम रोड आई माता मंदीरासमोरील बाजूस, बिबवेवाडी येथे घडली आहे. याबाबत आश्फाक रशीद सय्यद (वय. ३३, रा. साईबाबा नगर, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सय्यद हे येथील परिसरात कुटुंबियासह राहण्यास आहेत. रात्री साडे बाराच्या सुमारास फिर्यादी हे शालीमार सोसायटीजवळील गोडाऊनमध्ये होते. त्यावेळी त्यांना गॅस गळतीचा वास आला. बाहेरून पाहिले असता, काही लोक जमा झाले होते. त्यांना देखील गॅस गळतीचा वास येत होता. सर्वांनी गॅस गळतीचा शोध घेतला असता आई माता मंदीरासमोरील एका गोडाऊनच्या परिसरातील एका टाकीतून वास येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ती टाकी लिकेज झाल्याचे दिसून आले. त्यामुळे तेथील कामगारांना देखील श्वास घेण्याचा त्रास होता होता. चौकशीत हे गोडाऊन मुथ्था यांचे असून, मुलाणी हा तेथे मॅनेजर म्हणून काम पाहतो. मुथ्था यांचा पालिकेला पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. ते बाहेरच्या राज्यातून क्लोरिनचे सिलेंडर मागवून येथे ठेवत होते.

फिर्यादी आणि नागरिकांनी वायू गळतीची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्ष आणि पोलिसांना दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांना देखील श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांनी प्रसंगावधान दाखवत श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या २५ जणांना रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयासह जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ३० जवानांनी गळती झालेल्या वायुवर नियंत्रण मिळवले. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते, सुरज बेंद्रे, उपनिरीक्षक अमोल माने यांनी भेट दिली. आरोपींनी क्लोरीन वायूचा सिलेंडर निष्काळजीणे मोकळ्या जागेत ठेवला. त्याच्यावर कोणत्याही प्रकारची उपायोजना केली नाही. त्यामुळे विषारी वायू तयार होऊन तो लिकेज झाला आणि हवेत पसरला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊन त्यांच्या जीवास धोका निर्माण झाल्याचा ठपका ठेवत प्रकाश मुथ्था आणि साहिल मुलाणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Chlorine Leak Sickens 25 in Pune; Negligence Suspected.

Web Summary : A chlorine leak in Pune hospitalized 25 residents with breathing difficulties. Negligence is suspected, leading to charges against the property owner and manager for improper storage of the cylinder.
टॅग्स :PuneपुणेCylinderगॅस सिलेंडरpollutionप्रदूषणHospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरEmployeeकर्मचारीHealthआरोग्यfire brigade puneपुणे अग्निशामक दल